आज दिनांक 12 जानेवारी 2021 या दिवशी राष्ट्रमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या वतीने साजरी करण्यात आली यावेळी अनिस साथी याची बैठक घेण्यात आली सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद आणि सावित्रीबाई फूले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर जालना जिल्ह्यातील साथी यांची बैठक घेण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मार्गदर्शन करण्यासाठी नाशिक येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे हे उपस्थित होते त्यांनी यावेळी सर्व साथी यांच्याशी चर्चा केली आणि संघटने बाबत त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गिराम यांची कन्या कुमारी मनीषा गिराम हिने बी. ए. भरतनाट्यम् मध्ये यश मिळाल्याबद्दल तिचे अभिनंदन करण्यात आले तसेच गृहनिर्माण संघर्ष समितीच्या सचिवपदी संजय हेरकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे देखील अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रधान सचिव श्री मधुकर गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन शंकर बोर्डे यांनी केले या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गिराम, प्रधान सचिव मधुकर गायकवाड, संतोष मोरे, विजय सरोदे, नारायण माहोरे, सीमा नादरे, अनिता माहोरे, सोनाली शेख,निकिता आंबट, इत्यादी उपस्थित होते.
Leave a Reply