ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

५ जुलै आझाद हिंद सेना स्थापना दिनानिमित्त नेताजी सुभाष चंद्र बोस यांना विनम्र अभिवादन

July 5, 202112:44 PM 14 0 0

स्वातंत्र्यपूर्व काळातही महिलांना पुरुषांच्या बरोबरीने आझाद हिंद सेनेत स्थान देणारे नेताजी सुभाष चंद्र बोस
आजाद हिंद सेनेची स्थापना म्हणजे स्वातंत्र्यसंग्रामातील एक क्रांतिकारी पर्व समजले जाते .दुस ऱ्या महायुद्धाच्या काळात मध्ये सर्वत्र युद्धजन्य परिस्थिती असताना भारतामध्ये असलेले ब्रिटीशांचे राज्य कसे संपवावे या एका ध्येयाने प्रेरित झालेले नेताजी सुभाषचंद्र बोस. यांनी जर्मनीमध्ये हिटलरची अनेक वेळा चर्चा करून हिंदुस्तान मधील ब्रिटिशांना कसे परतवून लावता येईल यासंदर्भात चर्चा केली. कोणाचे सहाय्य मिळू शकेल हे जाणून घेतले. त्यानंतर जपानमध्ये आल्यानंतर त्यांनी जपानमध्ये जी भारतीय सैनिक कार्यरत होते त्या भारतीय सैन्य यांना एकत्र करून रासबिहारी बोस यांच्या नेतृत्वाखाली ५ जुलै या दिवशी आझाद हिंद सेनेची स्थापना केली .


.जपान मधून सर्वांनी दिल्लीपर्यंत कसे पोहोचावे यासाठी त्यांनी सक्षमतेने सर्व नियोजन केले. त्यांना चलो दिल्ली !जय हिंद ! या घोषणा देत स्वातंत्र्यासाठी चे स्फुरण यांना दिले.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात झाशीच्या राणी कार्य करणाऱ्या झाशीच्या राणी कडून आदर्श घेत महिलांनाही पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी होण्याची संधी नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी महिलांना दिली
*राणी ऑफ झाशी रेजिमेंट* ची 1942 मध्ये स्थापना केली. त्यांनी आझाद हिंद सेनेत महिलांनाही योगदान देता येईल अशी व्यवस्था केली.भारताला पारतंत्र्यातून सोडवण्यासाठी त्यांनी उचललेले हे पाऊल म्हणजे क्रांतिकारी पाऊल होते. यासाठी सर्व भारतीया महिलांचे नेताजींना विनम्र अभिवादन !

सौ रोहिणी जोशी, संभाजीनगर

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *