ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन

June 21, 202216:11 PM 39 0 0

अहमदनगर (अनिता काळे ) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिस्तबाग येथे जिजाऊंना अभिवादन व वृक्षारोपण जिजाऊ हा आदर्श मातृत्वाचा अखंड प्रेरणा स्तंभ मुख्याध्यापिका अनिता काळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिस्तबाग तालुका नगर येथील प्राथमिक शाळेत जिजाऊ स्मृतिदिनानिमित्त जिजाऊंना अभिवादन करण्यात आले राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ह्या आपणा सर्वांसाठी अखंड प्रेरणास्थान आहे असे अनिता काळे यांनी जिजाऊंची महती विशद करताना म्हणले जिजाऊ हा विचार आहे.

या गौरवशाली मातृत्वाचा अतिउच्च शिखराला जगात तोड नाही संस्कारांचा शौर्याचा धैर्याचा आदर्श म्हणजे जिजाऊ जिजाऊ तुम्ही नसता तर नसती दिसली अंगणी तुळस व आमच्या शिवबाला जन्माला घातले नसते तर नसते दिसले मंदिरावरील कळस धन्य ती माऊली जिजाऊ व धन्य ते शिवराय पराक्रमी मावळे यांच्या यशोगाथा व पराक्रमाचे पोवाडे घरोघरी गायले जातील जिजाऊ स्मृती दिनानिमित्त शाळेत वृक्षारोपण करण्यात आले आधार माणुसकीचा या संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते श्री भाग्य सव्वाशे यांनी शाळेसाठी वृक्षारोपण करण्यासाठी रोपे भेट दिली. याप्रसंगी जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी मुख्याध्यापिका अनिता काळे सुरेखा वाघ शितल आवारे प्रमुख पाहुणे श्री भाग्येश सव्वाशे योगिता वाघमारे अहिल्या सांगळे अंगणवाडी शिक्षिका लेंडे बाई आरोग्य परिचारिका माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *