ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सांगलीत सुर्यपुत्र यशवंतराव ऊर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

September 18, 202114:16 PM 50 0 0

सांगली ,(हिरकणी टीम ) भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष,बौद्धाचार्याचे जनक, चैत्य भूमीचे शिल्पकार, माजी आमदार सुर्यपुत्र यशवंतराव ऊर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी सांगली मध्यवर्ती कार्यालय,विश्वशांती बुद्ध विहार. येथे वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, सम्यक विद्यार्थी आंदोलन तसेच राजगृहाच्या सर्व संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. भैय्यासाहेब यांचे खरे नाव यशवंत. त्यांचा जन्म १२ डिसेंबर १९१२ रोजी मुंबई येथे झाला. लहानपणा पासूनच त्यांना न्यूमॅनेटीक आणि पायाच्या पोलीयो सारख्या आजाराने ग्रासले होते. गावठी औषधांच्या उपचाराने त्यांना बरे करण्यात आले. त्यांचे शिक्षण मॅट्रीक पर्यंतच झाले. त्यांचा परिणय १९ एप्रिल रोजी मीराताईंशी झाले.

भैय्यासाहेबांनी कधीही बाबासाहेबांच्या नावाचा फायदा घेतला नाही. त्यांनी स्वतःचे आयुष्य स्वतःच घडविले. त्यांनी सिमेंटचा कारखाना काढला. त्यानंतर मुंबई विमानतळाच्या परिसरात बांधकाम करणे हा नवीन उद्योग सुरु केला. त्यात त्यांनी कोणालाच वाटेकरी घेतले नाही. हा व्यवसाय सुरळीतपणे चालला होता. नंतर त्यांनी बाबासाहेबांच्या चळवळीत भाग घेण्यास सुरुवात केली. त्यांनी भारतभूषण प्रिंटींग प्रेस हा छापखाना सुरु केला, नंतर या प्रेसचे बुद्धभूषण प्रिटींग प्रेस असे नाव झाले. १९४४ पासून बाबासाहेबांच्या मुखपत्रांचे व्यवस्थापन तेच पाहत होते. जनता प्रबुद्ध भारत यांचे ते सर्वे सर्वा होते. बुद्धभूषण प्रिंटींग प्रेस मध्ये बाबासाहेबांचा ‘Thoughts on pakistan’ हा इंग्रजी ग्रंथ भैय्यासाहेबांनीच छापला. बाबासाहेबांनी हा ग्रंथ भैय्यासाहेब व मुकुंदराव यांना अर्पण केलेला आहे. बाबासाहेबांचा दुसरा एक ग्रंथ ‘Federation Versus Freedom’ हाही ग्रंथ भैय्यासाहेबांनी आपल्या छापखान्यात छापला. ‘Thoughts on Linguistic States’ हा ग्रंथ सुद्धा भैय्यासाहेबांनी छापला होता. त्यानंतर बाबासाहेबांच्या आदेशानुसार वा.गो. आपटे लिखित ‘बौद्धपर्व’ हा ग्रंथही त्यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आपल्या छापखान्यात छापून प्रसिद्ध केला.
भैय्यासाहेबांचे लिखाण अत्यंत तर्कशुद्ध आणि विचारगर्भ असे. त्यांच्या लिखाणातील व भाषणातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे म्हणी आणि वाकप्रचार यांचा मोठ्या प्रमाणावर वापर. भैय्यासाहेबांनी बाबासाहेबांची अनेक स्मारके उभारली. पहिले स्मारक त्यांनी मुंबई येथे बांधले. डॉ.आंबेडकर या सभागृहाचे भूमिपूजन २ एप्रिल १९५८ ला व उद्घाटन २२ जून १९५८ ला झाले.अश्या धुरंधर नेत्याचे १७ सप्टेंबर १९७७ रोजी झाले. भैया साहेब यांच्या जिवावर आधारित माहिती व जीवनक्रम वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा (उत्तर) अध्यक्ष राजेश गायगवाळे तसेच भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संघटक संजय संपत कांबळे आणि संस्कार विभाग सचिव सुजित कांबळे यांनी दिली. यावेळी वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हाध्यक्ष (दक्षिण) महावीर कांबळे,उमर फारूक ककमरी, संजय कांबळे,चंद्रकांत खरात, सुनिल कोळेकर,अनिल मोरे, हिरामण भगत, अमित बनसोडे,, मानतेश कांबळे तसेच भारतीय बौद्ध महासभेचे नितीन सरोदे,सिध्दार्थ ठोके, ऋषिकेश माने यांच्या बरोबर राजगृहाशी निगडीत असणारे पक्ष संघटना यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्य उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *