ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

नामदेव ढसाळांच्या काव्यवाचनाने अभिवादन; सप्तरंगी साहित्य मंडळाकडून स्मृतीदिन साजरा

January 17, 202215:42 PM 53 0 0

नांदेड – दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री नामदेव ढसाळ हे असामान्य प्रतिभा लाभलेले कवी होते. त्यांच्या कवितांनी इथल्या हक्कवंचितांचं जीवन वेशीवर टांगलं. सर्व सामान्यांच्या जीवनात ढसाळ यांच्या कवितांनी विद्रोहाचा विचार पेरला असे प्रतिपादन येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्य कार्याध्यक्ष मारोती कदम यांनी केले. ते सप्तरंगी साहित्य मंडळ जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने नामदेव ढसाळ काव्याभिवादन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे, उपाध्यक्ष नागोराव डोंगरे, कार्याध्यक्ष शंकर गच्चे, कोषाध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर, विद्रोही कवयित्री पूजा मेटे विद्रोही विचारमंचाचे विशालराज वाघमारे यांची उपस्थिती होती.

सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या बेलानगरस्थित मुख्य कार्यालयात जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने नामदेव ढसाळ यांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी स्तंभलेखक मारोती कदम हे होते.‌ सर्वप्रथम पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बोलताना ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे म्हणाले की, नामदेव ढसाळ हे एक कसलेले पँथर होते. त्यांच्या दलित पँथरच्या निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरू झालेल्या पँथर चळवळीत मी सहभागी झालो. तुरुंगवासही भोगला. त्यांच्या प्रेरणेने मी लिहिता झालो. परंतु आक्रमक विद्रोह न मांडता सम्यक विद्रोह मी माझ्या लेखणीतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कार्याध्यक्ष शंकर गच्चे म्हणाले की केवळ विद्रोह नाही तर एक विचार आहे. तो आजच्या साहित्यिकांनी विविध पातळ्यांवर समजून घेतला पाहिजे.
नामदेव ढसाळ यांच्या कवितांनी प्रस्थापित साहित्याला हादरा दिला. मराठी साहित्य परंपरेतील एक क्रांतिकारी कवी म्हणून ते गणले जातात. साठीच्या दशकातला तो एक असा कवी होता, की ज्याने मराठी साहित्यातील कवितेला एक नवे परिमाण मिळवून दिले. त्या काळात आंबेडकरी चळवळीला त्यांच्या रुपानं निधड्या छातीचं राजकीय नेतृत्व लाभलं होतं.‌ तरुणांसाठी तर दीपस्तंभासारखे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. या संदर्भाने समीक्षक प्रज्ञाधर ढवळे यांनी माहिती दिली.‌ त्यानंतर आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र : प्रियदर्शनी, खेळ, गोलपिठा, तुझे बोट धरून चाललो आहे मी, तुही यत्ता कंची? मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे, मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले, या सत्तेत जीव रमत नाही, मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे (निवडक कवितांचा संग्रह), गांडू बगीचा, निर्वाणा अगोदरची पीडा या त्यांच्या कवितासंग्रहातील कवितांचे काव्यवाचन केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर यांनी केले. सूत्रसंचालन नागोराव डोंगरे यांनी तर विद्रोही कवयित्री ज्ञपूजा मेटे विद्रोही विचार मंचाचे अध्यक्ष विशालराज वाघमारे यांनी आभार मानले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *