ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण शहरात गॅस शवदाहिनी चे भूमिपूजन

May 21, 202215:29 PM 39 0 0

उरण (संगिता पवार ) : उरण शहराच्या हद्दीत उरण नगरपरिषद यांच्या पुढाकाराने उरण नगरपरिषदेच्या बोरी स्मशान भूमी येथे उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या हस्ते शुक्रवार (दि.२० ) मे रोजी गॅस शवदाहिनी चे भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी उरण नागरिषद मुख्याधिकारी संतोष माळी ,उरण नगरपरिषद अभियंता झुंबर माने ,आरोग्य निरीक्षक हरेश तेजी , मेसर्स चिरंतन उद्योग चे विशाल केणी ,उरण नगरपरिषदेचे कर्मचारी ,ग्रामस्त आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोस्थान महा अभियान ( जिल्हा स्तर )या योजनेकडे उरण नगरपरिषद ने पाठपुरावा केला होता त्यला यश आले असून सदर योजने कडून कामा साठी सुमारे ९४,७९ ,१८२ /-रुपये मंजूर झाले आहेत .या रकमेतून गॅस शवदाहिनी आस्थापित करणे ,,शव दाहिनी हॉल व शेड चे काम करण्यात येणार आहे .सदर काम मेसर्स चिरंतन उद्योग,नवपाडा ठाणे यांना दिले असून कार्यादेश दिल्या पासून १५० दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे .अशी माहिती उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी दिली .
उरण नगरपरिषदेच्या पुढाकाराने उरण नगरपरिषद हद्दीत गॅस शवदाहिनी होत असल्याने या पर्यावरण पूरक उपक्रमामुळे नागरिककौतुक करीत आहेत

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *