जालना ( प्रतिनिधी) : यंदा तुरीचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला असून नाफेड तर्फे प्रती क्विंटल सहा हजार रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. खरेदी केंद्रावर होणारी गैरसोय टाळण्यासाठी तुर उत्पादक शेतकऱ्यांनी लवकर ऑनलाईन नोंदणी करून शासकीय खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा.असे आवाहन शिवसेना नेते, माजी मंत्री तथा जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुनराव खोतकर यांनी आज येथे बोलतांना केले.
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत केंद्र शासनाच्या आधार भूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेडच्या तुर खरेदी केंद्राचा शुभारंभ बुधवारी ( ता. २७) सभापती अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण,तालुका निबंधक परमेश्वर वरखडे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी विमल वाघमारे,पंडितराव भुतेकर,संतोष मोहिते,बाजार समितीचे संचालक अनिल सोनी, रमेश तोतला, गोपाल काबलिये,बाजार समिती चे सचिव रजनीकांत इंगळे,अनिल खंडाळे, मोहन राठोड,नाफेड चे अंकुश परकाळ ,सुर्यकांत कदम,प्रल्हाद जाधव,सचिन गोल्डे, शेतकरी शिवाजी मोरे ( खादगाव) यांची प्रमुख उपस्थिती होती.
अर्जुनराव खोतकर पुढे म्हणाले की, गतवर्षी हेक्टरी सहा क्विंटल उद्दिष्ट होते या वर्षी शासनाने हेक्टरी वीस क्विंटल पर्यंत तुर खरेदी चे निर्देश दिले असून एका शेतकऱ्यास २५ क्विंटल तूर विक्री करता येईल.प्रती क्विंटल सहा रूपये (६,००० ) हमीभाव जाहीर करण्यात आला. असे सांगून श्री. खोतकर म्हणाले,साठवण क्षमता असलेली गोदामे,डिजीटल काटे बाजार समिती ने उपलब्ध केले असून दररोज १२०० क्विंटल पर्यंत तुर खरेदी करण्याची सोय केली आहे. १२टक्कयांपर्यंत ओलावा असलेली तुरही खरेदी केली जाणार आहे.असे अर्जुनराव खोतकर यांनी नमूद केले. आतापर्यंत १०४१ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असून असल्याने शेतकऱ्यांनी नोंदणी करून शासकीय खरेदीचा लाभ घ्यावा असे आवाहन ही अर्जुनराव खोतकर यांनी केले. या वेळी बाजार समिती, नाफेडचे अधिकारी, कर्मचारी व शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Leave a Reply