ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या तयारीचा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतला आढावा

March 19, 202213:50 PM 27 0 0

सातारा हिरकणी (विदया निकाळजे) : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सातारा येथे 4 ते 9 एप्रिल 2022 दरम्यान होणार आहे. या स्पर्धेच्या तयारीचा आढावा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, दिलीप पवार आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे चांगल्या पद्धतीने नियोजन करावे, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील यांनी या बैठकीत स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंच्या निवास व्यवस्था, नाष्टा, जेवण व्यवस्थेची माहिती घेतली. तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना करुन पार्कींग व्यवस्था व अन्य इतर सोयी सुविधाचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *