ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

युवकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन घ्यावे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन

January 11, 202212:13 PM 40 0 0

सातारा – हिरकणी (विदया निकाळजे): जिल्हयात 15 ते 18 वयोगटातील युवकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम सुरु आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घेऊन लसीकरण करुन घ्यावे. ज्या नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे परंतु अद्यापपर्यंत दुसरा डोस घेतला नाही त्यांनी दुसरा डोस त्वरीत घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबत करत असलेल्या उपाययोजनांचा आढावा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात आला. यावेळी श्री. पाटील बोलत होते. या बैठकीला गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार पृथ्वीराज चव्हाण, शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, महेश शिंदे, दिपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, पालक सचिव ओमप्रकाश गुप्ता, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी आदी उपस्थित होते.
वाढती रुग्ण संख्या पाहता पुरेसा आरोग्य सोयी सुविधा तयार ठेवा, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, ज्या ऑक्सिजन प्रकल्पाचे काम सुरु आहे ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. कोरोना संसर्गामुळे ज्यांचा मृत्यु झाला त्यांच्या वारसांना 50 हजार सानुग्रह अनुदान दिले जाते या अनुदानापासून एकही कुटुंब वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
जिल्ह्यात कोरोना संसर्ग रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. एकही रुग्ण औषधोपचारापासून वंचित राहणार नाही यासाठी आरोग्य विभागाने यंत्रणा सज्ज ठेवावी तसेच जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढवावी. शासनाने घातलेल्या निर्बंधांचे सर्व यंत्रणांनी जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी. जे निर्बंधांचे पालन करणार नाही अशा नागरिकांवर कारवाई करावी. सध्या जिल्ह्यात वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता नागरिकांनी घाबरुन न जाता रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी शासनाने व प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले आहे. कोरोनासंदर्भात करत असलेल्या उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सादरीकरणाद्वारे बैठकीत दिली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *