सातारा प्रतिनिधी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय कराड येथील विद्यार्थिनींच्या वतीने ग्रामीण कृषीकार्यानुभव कार्यक्रमांतर्गत लिंब ता. सातारा येथे शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
कृषीकन्या कु. शिवांजली वर्णेकर यांनी दुग्ध व्यवसाय, दुग्ध प्रक्रिया, जनावरांचे लसीकरण, माती परीक्षण, फळप्रक्रिया इ. विषयांवर शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवले. कृषीकन्या कु. निकिता नेवसे यांनी जैविक व रासायनिक बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून बीजप्रक्रियाचे महत्त्व, गरज आज आणि उपयोग या विषयावर सविस्तर माहिती दिली.
या उपक्रमासाठी कराड कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.आर. सूर्यवंशी, कार्यक्रम अधिकारी डॉ.अर्चना ताठे, डॉ. उल्हास बोरले, डॉ.धनंजय नावडकर, डॉ. आनंद चवई, डॉ.स्नेहल जुकटे, डॉ.शैलेद्र कांबळे यांनी मार्गदर्शन केले.
Leave a Reply