सातारा, गोंदवले खुर्द ता. माण , ग्रामीण (कृषी) जागरूकता आणि कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी ,संलग्न दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय ,राजमाची येथील विद्यार्थी कृषिदूत सौरभ गोरखनाथ बनसोडे याने (गोंदवले खु) येथे आधुनिक शेती , खते, बी-बियाणे , माती परीक्षण , सेंद्रिय शेती , औषध फवारणी या विषयांवर मार्गदर्शन केले.
यावेळी शेती आधारित प्रात्यक्षिके सादर करणे शेत जमीन व्यवस्थापन व पीक उत्पादन या विषयावर आधारित माहिती दिली व तण नियंत्रणाच्या वेगवेगळ्या पद्धतींची माहिती प्रात्यक्षिकांसह करून दाखवण्यात आली. शेतीच्या समस्या व विविध अडचणीवर कोणकोणत्या उपाययोजना करता येतील, यासारख्या विविध विषयांवर शेतकर्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. एस. एम. शिंदे , प्रा. व्ही. व्ही. माने , प्रा. बागल सर , प्रा. जगदाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाची माहिती देण्यात आली. यावेळी शेतकरी उपस्थित होते.
Leave a Reply