ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मोकाशी कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूताकडून गोंदवले येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन

September 24, 202112:49 PM 67 0 0

सातारा,(विदया निकाळजे) : गोंदवले खुर्द ता. माण , ग्रामीण (कृषी) जागरूकता आणि कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी ,संलग्न दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय ,राजमाची येथील विद्यार्थी कृषिदूत सौरभ गोरखनाथ बनसोडे याने (गोंदवले खु) येथे आधुनिक शेती , खते, बी-बियाणे , माती परीक्षण , सेंद्रिय शेती , औषध फवारणी या विषयांवर मार्गदर्शन केले.


यावेळी शेती आधारित प्रात्यक्षिके सादर करणे शेत जमीन व्यवस्थापन व पीक उत्पादन या विषयावर आधारित माहिती दिली व तण नियंत्रणाच्या वेगवेगळ्या पद्धतींची माहिती प्रात्यक्षिकांसह करून दाखवण्यात आली. शेतीच्या समस्या व विविध अडचणीवर कोणकोणत्या उपाययोजना करता येतील, यासारख्या विविध विषयांवर शेतकर्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. एस. एम. शिंदे , प्रा. व्ही. व्ही. माने , प्रा. बागल सर , प्रा. जगदाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमाची माहिती देण्यात आली. यावेळी शेतकरी उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *