ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कोरोनाचे नियम पाळून नाताळचा सण साजरा करावा मार्गदर्शक सूचना जारी

December 25, 202111:56 AM 46 0 0

जालना दि. 24 :- कोरोना विषाणुच्या संक्रमणाच्या पार्श्वभुमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमिक्रॉन ही नवीन विषाणु प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. या ओमिक्रॉन विषाणु प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये, रहिवाशांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर ख्रिश्चन बांधवांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून मोठ्या प्रमाणात एकत्र न येता नाताळचा सण साजरा करावा. निरोगी आरोग्यासाठी खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना जिल्हा प्रशासनाने जारी केल्या आहेत. ख्रिश्चन बांधवांनी या वर्षी देखील नाताळचा सण आरोग्याच्या दृष्टीकोनातून पूर्णत: खबरादारी घेऊन साध्या पध्दतीने साजरा करावा. कोवीड -19 च्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन महसुल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या परिपत्रकानुसार दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करणे अत्यावश्यक आहे.

नाताळ, ख्रिसमस निमित्ताने चर्चमध्ये उपलब्ध आसन क्षमतेच्या 50 टक्के पर्यंत लोकांना चर्चमध्ये उपस्थित राहण्यास परवानगी असेल. चर्चमध्ये कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सुरक्षित अंतर राखले जाईल तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच चर्चमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. नाताळच्या दिवशी चर्चमध्ये प्रभू येशूंच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री अगर काही वस्तू ठेवल्या जातात. त्या ठिकाणी सुरक्षित अंतर व स्वच्छतेचे नियम पाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्त यांचे स्तुतीगीत गाण्यासाठी कमीत कमी गायकांचा समावेश करण्यात यावा. त्यावेळी वेगवेगळ्या माईकचा वापर करुन सुरक्षित अंतरचे पालन करण्यात यावे. चर्चच्या बाहेर, परिसरात दुकाने अगर स्टॉल लावू नयेत. सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर मोठ्या संख्येने एकत्र येणे अथवा गर्दी करणे टाळावे. कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होईल, अशा धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे अथवा मिरवणुकांचे आयोजन करण्यात येऊ नये. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे काटकोर पालन करण्यात यावे. कोविड -19 व विशेषत्वाने ओमिक्रॉन या विषाणू प्रजातीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नगरविकास विभाग, मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगर पालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर अनुपालन करणे बंधनकारक राहील, असे अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *