ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

गुंडेवाडी येथील जि. प. शाळेत संविधान दिन साजरा

November 27, 202113:44 PM 42 0 0

जालना (प्रतिनिधी) : आज दिनांक 26/11/2021 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंडेवाडी येथे सविधान दिन” माझे सविधान माझा अभिमान” या कार्यक्रमांत विविध शालेय कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम भारतरत्न तथा सविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .

त्यांनतर 26/11 हल्ल्यात शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यांनतर सर्व विद्यार्थी व शिक्षक मिळून सविधांनाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले.तदनंतर विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या जसे चित्रकला,रांगोळी व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.रवींद्र कार्लेकर,सामजिक कार्यकर्ते श्री.अर्जुन गजर,शाळेतील शिक्षिका निता बागडी ,तृष्णा बोर्डे,रोहिणी गायकवाड व शिक्षक सुनील साबळे यांची उपस्थिती होती

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *