ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

गुरु-शिष्य परंपरा, हिंदू संस्कृतीचा मानाचा तुरा

July 18, 202113:11 PM 78 0 0

नर जन्माचे सार्थक होण्यासाठी गुरूंचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरु-शिष्य परंपरा हा आपल्या हिंदु संस्कृतीचा मानाचा तुरा आहे. संसारात असतांना माणसाची नौका अनंत संकटांमुळे हेलकावे खात असते. तेव्हा त्याला पदोपदी मार्गदर्शन करून त्याची नौका या संसाररूपी भवसागरातून पार करण्याची किमया केवळ गुरूच करतात. गुरु शिष्याला मोक्षप्राप्तीचा मार्ग केवळ दाखवत नाहीत तर शिष्याला साधना शिकवतात आणि त्याच्याकडून ती करवूनही घेतात. मनुष्याला चिरंतन आनंद कसा प्राप्त होईल, त्याचे आचार-विचार, संस्कार कसे आदर्श असावेत, याचे सुस्पष्ट विवेचन आपल्या ऋषी-मुनींनी सहस्त्रो वर्षे तप करून विविध धर्मग्रंथांमधून लिहून ठेवले आहे.

इतकी अमोघ आणि अमूल्य ज्ञानसंपदा देणाऱ्या ऋषींविषयी कृतज्ञता व्यक्त करू तितकी थोडीच आहे. हिंदूंकडे असलेल्या या अमूल्य ज्ञानसंपदेमुळे जगभरातील अन्य पंथीय कितीही भौतिक प्रगतीचा टेंभा मिरवत असले, तरी आत्मिक आनंदासाठी हिंदूंच्या संतांसमोर ते नतमस्तक होताना दिसत आहेत आणि संतांनी सांगितलेली साधना करत आहेत. अशी ही अमूल्य ज्ञानाची आणि गुरू-शिष्य परंपरेची शिदोरी आपल्याला लाभली आहे, हे आपले अहोभाग्य आहे. आद्य शंकराचार्यांनी म्हटले आहे, “ज्ञानदान करणार्‍या या सद्गुरूंना शोभेल, अशी उपमा या त्रिभुवनात सापडणार नाही. त्यांना परिसाची उपमा दिली तरी तीही अपुरीच आहे कारण परीस हा लोखंडाला सुवर्णत्व देतो परंतु त्याचे परीसत्व देत नाही”. सद्गुरुंचे महत्त्व वर्णन करायला शिष्याला शब्दही अपुरे पडतात. अशा सद्गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे आषाढ शुद्ध पौर्णिमा, म्हणजेच गुरुपौर्णिमा. खरे तर, अशा जन्मोजन्मीचा उद्धार करणाऱ्या गुरुंप्रती रोजच कृतज्ञता व्यक्त करायला हवी. आजच्या या रज-तमात्मक वातावरणामध्ये सद्गुरूंनी दाखवलेल्या साधनारुपी वाटेवर मार्गक्रमण करूया आणि स्वतःचा उद्धार करून घेऊया.

अनिता जोशी, संभाजीनगर

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *