ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

गुरू

July 23, 202113:04 PM 18 0 0

मांडाव मी गुरूंना शब्दात
इतके बळ नाही माझ्या लेखनीत
परंतु माझा प्रत्येक क्षण चालतो
नेहमी गुरूंच्याच उपदेशात….

गुरू शिष्याच हे मौलिक नात
नाही सांगता येणार फक्त कवितेत
जे यश आजवरचे माझ्या पदरात
त्यात माझ्या गुरूचा वाटा बहुत…

गुरू हाच भगवंताचा साक्षात्कार
तो आहे काळोखात चंद्र चकोर
विद्यार्थ्यांकरी तो ज्ञानाचा भांडार
गुरूविन निरर्थक जीवन जाणावे सर्व…

गुरुमुखीचा एक-एक उपदेश
दुर करी आपुल्या जीवनातील क्लेश
सामावून घेतो तो आपुले सर्व द्वेष
आपुल्या जीवनी मानावे त्यास शेष…

गुरू मायेचा क्षिराब्दी सागर
त्याच्यातच आहे मायेचा पाझार
त्याच्याविन न चाले इंद्राचाही दरबार
गुरूविन सुने हे अवघे चराचर….

कवयित्री-
कु.मयुरी मल्लिनाथ जायप्पा
७४९८२१५८५६

Categories: कविता, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *