तुम्ही हातावर दिलेली छडी
खरचं घडवत होती हो पिढी…
छडीच झालं राजकारण
कायद्याचा ही आणला धाक…
तिथच फसलं गणित अन्
गुणवत्तेचं रूतून बसलं चाक…
आम्ही पहिली दुसरीत असताना
तुम्ही वर्गात कायम असायचा…
सकाळच्या राष्ट्रगिता पासून ते
वन्देमातरम् पर्यत पुढे दिसायचा…
पाचवी सहावीत गेलो तेव्हा
शासनाचं बदलून गेलं धोरण…
निवडणुका सर्वेक्षणामुळं
अभ्यासाच झालं राजकारण…
मतदार यादी जनगणनेचं
तेव्हा तुमच्याकडेचं आलं काम…
लोकशाहीच्या बाजारात
मिळाला गुणवत्तेला स्वल्पविराम…
आठवी पर्यतच्या परीक्षेला तर
शासनाने उगाच लावला चाप…
श्रेणीचा चढता आलेख बघून
किती बिनघोर असायचा बाप…
दहावीत कुणाकुणाला तर
नाव लिहायची परापत होती…
तरीसुद्धा एक एक पिढी
तशीच ढकलून पुढे जात होती…
गुरूजी गुणवत्तेबरोबर
तुम्ही खरं जग शिकवत होता…
ओसाड या माळरानावर
कसदार पीक पिकवत होता…
आता शासकीय धोरणांनी
रासायनिक खतांची घेतली जागा…
गुणवत्तेच्या बाजारात रोज
एक एक उसवत जातोय धागा…
प्रमोद जगताप फलटणकर
रा.गोखळी ता.फलटण(सातारा)
संवाद – 8554857252
Leave a Reply