ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

गुरूपौर्णिमा

July 16, 202113:51 PM 7 0 1

गुरुपौर्णिमा म्हणजे शिष्याच्या जिवनातील महत्वाचा दिवस. त्यांच्या प्रती क्रुतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस !
वर्षभर गुरूंनी सांगितलेली साधना करून गुरूकृपेस पात्रं होण्यासाठी केलेले प्रयत्न गुरू चरणी अर्पण करणे होय.
आपल्या जीवनात गुरूंचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुरूंची महती आपण शब्दात वर्णन करू शकत नाही. गुरूंची कृपा शिष्यासाठी सर्व काही असते. तन- मन- धन व प्रसंगी प्राणही अर्पण करावे लागले तरीही कमीच आहे. गुरू प्रत्येक क्षणी आपल्याला योग्य मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करतात. आपण कितीही अयोग्य वागलो तरीही ते आपला हात सोडत नाहीत. आपल्या जिवनात कितीही कठीण प्रसंग आला आणि त्या क्षणी आपण हाक मारली तर ते आपल्याला मदत करण्यासाठी येत असतात.


एकदा नारद मुनी विष्णू लोकांत गेले तेंव्हा त्यांचे यथोचित सन्मान केला पण जेंव्हा ते बाहेर पडले तेव्हां विष्णुने लक्ष्मी मातेला सांगितले की नारदमुनी बसलेली जागा शेणाने सारवून घ्या. लक्ष्मी मातेला प्रश्न पडला आत्ताच त्यांचे चांगले स्वागत केले आणि आता ती जागा शेणाने सारवून घ्या असे का सांगत आहात. हे सर्व नारदमुनींनी बाहेरून ऐकले व ते आत आले, त्यांनी महाविष्णूला विचारले हे प्रभो हे मी काय ऐकतो आहे, मी बसलेली जागा शेणाने सारवून घ्यायला का सांगत आहात. तेव्हां महाविष्णूने सांगितले की ज्यांना गुरू नाहीत ते बसलेली जागा पण अपवित्र होते. यावरून आपल्याला गुरूंचे महत्त्व लक्षात आले असेल म्हणून गुरू केल्याविना तरणोपाय नाही.
गुरू विन कोण दाखविले वाट
आयुष्याचा पथ हा दुर्लभ
आवघड डोंगर घाट
गुरू विन कोण दाखविले वाट
जय गुरुदेव ! जय गुरुदेव !!

– सौ. आशा वटृमवार, संभाजीनगर

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *