ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण येथे गुरुपौर्णिमा साजरी

July 24, 202117:29 PM 23 0 0

उरण (संगीता ढेरे ) गुरुपौर्णिमा निमित्त उरण शहर सह ग्रामीण भागात सर्वत्र गुरु पूर्णिमा साजरी करण्यात आली .उरण शहरातील आनंद नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . उरण शहरातील केगाव ग्रामपंचायत हददीतील विनायक कोळीवाडा येथेजगदीश कोळी यांच्या मालकीचे एक मुखी दत्त मंदिरात अभिषेक ,आरती ,पालखी ,महाप्रसाद ,आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ,उरण केगाव रोड वरीलस्वामी समर्थ मठात विविध कार्यक्रमाचे आयोजन करणायत आले होते .


उरण शहरातील आनंद नगर येथे असलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्रात सकाळी ८ वाजता भूपाळी आरती ,८.३० वाजता श्री स्वामीं अभिषेख ,९. वाजता सामुदायिक श्री स्वामी सारामृत वाचन ,१० .३० वाजता स्वामींची आरती १०.४५ वाजता गुरुपद ,सायंकाळी ६.३० वाजता आरती दुपारी महाप्रसाद आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
पनवेल तालुक्यातील मानघर येथे श्री स्वामी समर्थ मठात सकाळी आरती ,भजन ,दुपारी महाप्रसाद सायंकाळी पालखी सोहळा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *