ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

लॉयन्स क्लब गोल्डच्या वतीने गुरूपौर्णिमा साजरी; गुरू हेच मानव रूपातील ईश्वर – अशोक हुरगट

July 25, 202117:16 PM 14 0 0

जालना। गुरू हेच मानव रूपातील ईश्वर आहेत़ गुरूंचे आशीर्वादच आपले जीवन फुलवतात, असे प्रतिपादन लॉयन्स क्लब ऑफ जालनाचे लॉ़ अशोक हुरगट यांनी गुरू पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले आहे़ लॉयन्स क्लब ऑफ जालना ग्रुप गोल्ड, रॅपीड, प्राईड, उन्नती, ओजस्वी व स्टील यांच्यातर्फे हॉटेल अमीतच्या सभागृहात गुरू पौर्णिमा साजरी करण्यात आली़ यावेळी शहरातील जेष्ठ पंडीत बालकिशन शर्मा, गायत्री परिवाराचे संस्थापक व सेवानिवृत्त प्रा़ किशोर गुप्ता यांचा सत्कार करण्यात आला़ यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गोल्डचे अध्यक्ष अशोक हुरगट होते तर यावेळी व्यासपीठावर माजी प्रांतपाल लॉ़ विजय बगडिया, चेअरमन मुरारीलाल गुप्ता, रॅपीडचे अध्यक्ष सुनिल पांडेय, उन्नतीचे अध्यक्ष हनुमानप्रसाद भारूका यांची उपस्थिती होती.


यावेळी पुढे बोलतांना अशोक हुरगट म्हणाले की, गुरूवरील निस्सीम भक्ती व श्रध्दा आपल्याला सर्व संकटातुन तारूण नेते़ गुरूंचा आशीर्वादरूपी वर्षाव आपले जीवन फुलवतो़ यावेळी बोलतांना लॉ़ विजय बगडिया म्हणाले की, गुरूविना अध्यात्मिक विकास शक्य नाही़ गुरू परंपरा भारतीय संस्कृतीची देण आहे़ तसेच अशोक मिश्रा यांनी आपल्या मनोगतात प्रत्येकाने गुरूमंत्र घेऊन नित्य नियमाने जप करावा त्याने आपल्या मनास शांती मिळते, असे सांगितले़
यावेळी सत्कारास उत्तर देतांना पंडित बालकिशन शर्मा म्हणाले की, जिवनात गुरूमुळे आपल्याला ऊर्जा प्राप्त होत असते़ गुरूचे महात्म्य शब्दात वर्णन करणे शक्य नाही़ आपल्या गुरूमुळेच आज वयाच्या 88 व्या वर्षी देखील आपण स्वावलंबी जीवन जगत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले़ प्रा़ किशोर गुप्ता यांनी यावेळी गुरू परंपरेचा इतिहास सांगुन सत्काराबद्दल सर्वांचे आभार मानले़ कार्यक्रमाच्या सुरूवातीस लॉ़ रामदेव क्षोत्रीय यांनी सत्कारमुर्तींचा परिचय दिला़ लॉ़ लक्ष्मण पोपट, लॉ़ ललीत कामड यांनी गुरूंचा सत्कार केला तर लॉ़ कमल गोयल यांनी आभार मानले़

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *