ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

ज. ए. इ.ची पुर्व प्राथमिक, व उच्च प्राथमिक शाळा वायुविद्युत केंद्र  येथे सावित्रीबाई फुले व जिजाऊ जयंती सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा

January 13, 202213:56 PM 50 0 0

 उरण ( तृप्ती भोईर ) : उरण दिनांक १२ जानेवारी बुधवार रोजी जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटची पुर्व प्राथमिक , प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा वायुविद्युत केंद्र वसाहत बोकडविडा उरण या शाळेत सावित्रीबाई फुले व जिजाऊ जयंती सप्ताह मोठ्या थाटामाटात साजरा झाला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. हेमलता कवळसे मॅडम व त्यांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी १२ जानेवारी राजमाता जिजाऊ जयंती चे औचित्य साधून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना थेट प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध करून या विशेष दिनी श्री. समर्थ कृपा सखी स्वयंसहाय्यता संस्था उरण या संस्थेच्या अध्यक्षा व अष्टभुजा हिरकणी साप्ताहिक रायगड जिल्हा कार्यकारी संपादिका सौ. संगीता ढेरे मॅडम व बाळकडू आणि अष्टभुजा हिरकणी साप्ताहिकाच्या उरण प्रतिनिधी सौ. तृप्ती भोईर मॅडम यांना प्रमुख पाहुण्या म्हणून पाचारण करण्यात आले होते.


कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेची प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुजा व दिपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर शाळेतील शिक्षिकेंनी गुलाबपुष्प देउन मान्यवरांचे स्वागत केले. शाळेतील शिक्षिका आरती म्हात्रे मॅडम यांनी सुंदर शब्दांत स्वागत व क्षमा थळी या शिक्षिकेनी पाहुण्यांचा परिचय थोडक्यात सादर केला. सौ. संगीता ढेरे मॅडम नी आपल्या भाषणात राजमाता जिजाऊंची ऐतिहासिक ओळख व महती सुंदर शब्दांत सांगितली. त्याचप्रमाणे त्यांना लहानपणापासूनच असलेली समाजसेवेची आवड, समाजसेवेला वयाचे बंधन नसते ती कोणत्याही वयात करता येतेहे उदाहरणे देऊन पटवून दिले. त्यामुळे समाजातील प्रत्येक माणसाने समाजसेवा हिच ईश्वरसेवा आहे असे मानून ती केलीच पाहिजे. असे विचार श्रोत्यांसमोर मांडले. त्यांनतर च्या पाहुण्या सौ. तृप्ती भोईर यांनी आपल्या भाषणात राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अजुन एक १२ जानेवारी म्हणजे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त युवा दिन साजरा केला जातो. तसेच ६ जानेवारी म्हणजे बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय पत्रकार दिनाचे महत्त्व सांगुन प्रत्येक विद्यार्थ्याने आपली जिद्द, आवडनिवड, नेतृत्व, स्पर्धेत सहभाग , लेखन, वाचन या गुणांना जवळ करावे.असे मोलाचे मार्गदर्शन केले. हा संपूर्ण कार्यक्रम कोरोना प्रतिबंधक निर्बंधांचे पालन करून साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे राजमाता जिजाऊंच्या वेशभुषेत याच शाळेची विद्यार्थिनी ऋतुजा बाबर हिने राजमाता जिजाऊंचे स्वगत खुप छान शब्दांत मांडले.

सावित्रीबाई फुले व जिजाऊ जयंती सप्ताह निमित्ताने साजरा केलेला हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे चेअरमन श्री सदानंदजी गायकवाड साहेब, अमित म्हात्रे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ हेमलता कवळसे मॅडम , सुनीता भोये, पुष्पा पडवळ, वृंदा पाटील, सरिता कजबजे, मनिषा पाटील, पल्लवी पंडित, पल्लवी शिरंगारे, सई भस्मे, प्राजक्ता जोशी, रोशनी घरत , कविता धादवड, मनिषा सदावर्ते, आरती म्हात्रे, क्षमा थळी, ज्योती जाधव या शिक्षकवृदांनी व इतर शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *