ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण पोलीस स्टेशन मध्ये हळदीकुंकू समारंभ साजरा

February 20, 202214:43 PM 40 0 0

उरण (तृप्ती भोईर) :  दिनांक ,१८ /०२/२०२२ शुक्रवार रोजी सुमारे २२ वर्षांनंतर मा. सुनील पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण पोलीस यांच्या सहकार्याने उरण पोलीस स्टेशन च्या सुशोभित केलेल्या प्रांगणात उत्साहवर्धक वातावरणात हळदीकुंकू समारंभ साजरा झाला. बेलापूर येथील सुत्रसंचालिका महाराष्ट्र पोलीस हवालदार शुभांगी पाटील यांच्या दमदार आवाजात प्रथम स्वर्गीय गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या गोड स्मृतींना उजाळा देऊन, दिदींना विनम्र अभिवादन करून शुभांगी पाटील यांनी सुत्रसंचलन सुरु केले त्यांच्या सुत्रसंचलनातील शब्दफेक, काव्यश्रुती आवाजातील बारकावे, विनोद बुध्दी, हे वाखाणण्याजोगे होते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश वंदनानाने किंवा बुध्दी ची देवता श्री सरस्वती च्या पुजनाने होते इथेही दंडाधिकारी उरण कोर्ट जज्ज मा. प्रियांका पठाडे यांच्या शुभ हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन, व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
यावेळी या कार्यक्रमात उपस्थिती लाभलेले प्रसिद्ध गायक मोहन फुन्डेकर यांची ख्याती म्हणजे त्यांच्या एकाच गळ्यातून स्त्री-पुरुष असे दोन्ही आवाजात ते गातात. गानसम्राज्ञी स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या आवाजात “ए मेरे वतन के लोंगो “हे गाणे गाऊन लता दीदी यांना गाण्यातुन भावपूर्ण श्रध्दांजली वाहीली. व जमलेल्या प्रेक्षकवर्गात देशभक्तीचे स्फुरण निर्माण केले. त्यांच्या गाण्याच्या सुरेल आवाजाने , व त्यांनी गायलेल्या देशभक्ती वरील गीताने वातावरण मंत्रमुग्ध झाले.
उरण महिला महाराष्ट्र पोलीस हवालदार प्रणीती पाटील, रचना ठाकूर, मपोना कवीता हासे, प्रिती म्हात्रे, अमिता पाटील, महाराष्ट्र पोलीस शिपाई सुप्रिया ठाकुर, सुरेखा राठोड, प्रियांका पाटील, यांनी हळदीकुंकू समारंभासाठी आलेल्या सर्व महिलांना हळदीकुंकू लावुन , वाण म्हणून भेटवस्तू , व गुलाब पुष्प देण्यात आले. पोलिस अधिकारी व कर्मचारी पती पत्नींकडुन गंमतीशीर खेळ, उखाणे, व विविध प्रश्नमंजुषेसारखे खेळ घेऊन कार्यक्रमाची रंगत वाढवली, खर तर “सद्ररक्षणाय खलनिग्रहणाय” या उक्तीप्रमाणे चांगले जतन करून वाईटाला शासन करण्यासाठी अहोरात्र झटणारी ही पोलिस वर्दी या हळदीकुंकू च्या कार्यक्रमाच्या वेळी आपल्या कुटुंबासह मनमुराद आनंद लुटत होती, देहभान विसरून खेळात समरस होवून आनंद घेत होते.
या वेळी सुत्रसंचालिका शुभांगी मॅडम ची शाब्दिक कोपरखळी, मधेच एखादी शब्द गुगली कार्यक्रमाची मनोरंजकता निर्माण करीत होती. या पोलिस वर्दी कडून खेळल्या गेलेल्या खेळात श्री. व सौ .अधिकारी, श्री. व सौ.पाटील, श्री. व सौ.कातकर , श्री. व सौ. म्हात्रे, श्री. व सौ. गीते, श्री. व सौ.माने, श्री. व सौ. कोकाटे श्री. व सौ. पवार, पी. एस. आय. सोनावणे साहेब व त्यांच्या सौ. हे सहभागी झाले होते.
उरण पोलिस स्टेशन च्या या आयोजित केलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमासाठी लाभलेली उपस्थिती सौ. सायली म्हात्रे (उरण नगराध्यक्षा) , सौ. भावना घाणेकर (राष्ट्रवादी उरण विधानसभा),सौ.सीमा घरत (शेकाप उरण तालुका अध्यक्षा)सौ. रंजना तांडेल (शिवसेना उरण तालुका अध्यक्षा) , सौ. नायदा ठाकूर (माझी नगराध्यक्षा), सौ. आफशा मुकरी (उरण शहर काँग्रेस अध्यक्षा), यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. उरण नगराध्यक्षा सौ. सायली म्हात्रे यांनी महिलांच्या बाबतीत घडणारे सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात महिलांची सुरक्षितता व महिलांनी जागृत होण्यासाठी सावधानता कशी बाळगावी याबाबत वक्तव्य केले तर राष्ट्रवादी उरण विधानसभेच्या सौ. भावना घाणेकर यांनी ही महिलांना सतर्क रहाण्यासाठी सक्षमीकरण, व त्यांच्या वर होणाऱ्या अन्याय या विषयावर आपले विचार मांडले.
उरण वरिष्ठ पोलीस मा. सुनील पाटील,पीएसआय गायकवाड, पीएसआय सोनावणे, पोलीस निरीक्षक भीमराज शिंदे, युवराज जाधव, हरिदास गिते, सचिन पाटील यांच्या मोलच्या योगदानामुळे कार्यक्रम सुंदररित्या साजरा करण्यात आला. तसेच मोरा पोलीस स्टेशन च्या महाराष्ट्र पोलीस हवालदार सौ. लता रजपूत, सौ. सचिता पाटील, सौ. पाटील मॅडम याही आवर्जून उपस्थित होत्या. उरण तालुक्यातील कुसुम ठाकूर, सामिया बुबेरे, गौरी देशपांडे, गौरी मंत्री, दिपा मुकादम आदी मान्यवर व पत्रकार दिप्ती पाटील , तृप्ती भोईर, संगिता पवार, लिना पाटील यांच्या सह उरण तालुक्यातील विविध क्षेत्रातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *