ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

वास्तू विहार येथे हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात साजरा

February 8, 202216:02 PM 42 0 0

रायगड (देवयानी कुलकर्णी ) : दरवर्षीप्रमाणेच तब्बल बारा वर्षांची परंपरा जपत अन्नपूर्णा महिला बचत गटाचा संक्रांति विशेष हळदी कुंकू समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. मकर संक्रांति नंतर पुढे पंधरा दिवस चालणारा हा सर्व स्त्रियांचा आवडता कार्यक्रम म्हणजेच हळदीकुंकू. हे हळदीकुंकू रथसप्तमीपर्यंत कधीही करता येते. म्हणूनच सर्व स्त्रियांच्या सोयीचा व सुट्टीचा दिवस म्हणजेच रविवार साधून दिनांक ६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी वास्तु विहार के एच वन सोसायटी मधील अन्नपूर्णा महिला बचत गटातर्फे व के एच वन सोसायटीच्या तीनही कमिटीतर्फे हळदीकुंकू समारंभ व सभापती संजना कदम त्यांचा सत्कार समारंभ दोन्हीही एकाच वेळी आनंदात व उत्साहात पार पडले.

संजना कदम या नगरसेविका पदावर गेली चार वर्षे कार्यरत होत्या. आणि त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळेच त्यांची पनवेल महानगरपालिकेत सभापती या पदावर बिनविरोध निवड व नियुक्ती करण्यात आली. त्यामुळेच मकर संक्रांतीच्या हळदी कुंकू चे औचित्य साधून संजना कदम यांच्या कौतुकास्पद त्यांचे एक छोटीशी प्रेमाची भेट देऊन व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले. तसेच सर्व महिलांनी त्यांना हळदी-कुंकू लावून,तिळगूळ देऊन व संक्रांतीचे वाण देऊन त्यांना त्यांच्या पुढील कार्यातील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यावेळी संजना कदम यांनी महिलांसाठी प्रेरणादायी असे आपले मत थोडक्यात मांडले. आपल्या भागातील कामे तसेच वास्तू विहारमधील जनतेला येणाऱ्या अडचणी लवकरात लवकर संपुष्टात येतील अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या महिलांनी ही थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी अन्नपूर्णा बचत गटाच्या व के एच वन सोसायटीच्या प्रमुख श्रद्धा सावंत, पत्रकार देवयानी कुलकर्णी, प्राची कुलकर्णी, बेलापूर महिला पोलिस कर्मचारी संगीता राठोड, न्यूरोलॉजिस्ट स्वप्ना म्हाळगे, छाया कदम,प्रेरणा डवले, कविता हिनुकले,सुवर्णा साळुंखे, सविता दसवडकर आणि अनेक मान्यवर महिला उपस्थित होत्या.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *