ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पोलिस अधिकारी व महिला पोलिस कर्मचारी यांच्या वतीने हळदीकुंकू समारंभ मोठ्या थाटामाटात साजरा

February 10, 202212:37 PM 46 0 0

 उरण (तृप्ती भोईर)  :उरण तालुक्यातील न्हावा शेवा पोलिस ठाणे उरण येथील महिला पोलिस अधिकारी व महिला पोलिस कर्मचारी यांच्या वतीने दिनांक ७/२/२०२२ सोमवार रोजी उरण तालुक्यातील विविध क्षेत्रातली महिलांना आमंत्रित करून कार्यक्रमाची सुरुवात विघ्नहर्ता श्री गणेशाच्या प्रतीमेचे पुजन वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. मधुकर भेटे साहेब यांच्या शुभहस्ते करून करण्यात आली . तसेच आत्ताच निधन झालेल्या गानसम्राज्ञी स्वर्गिय लता मंगेशकर यांच्या स्मृतीला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
पोलिस नाव ओठांवर येताच अनेकांच्या मनात भीती निर्माण होत असते. मग ते पोलिस असो वा महिला पोलिस पण मनात एक प्रकारची वेगळीच भीती असते पण ते ही माणुसच आहेत, त्यांनाही भावना आहेत. सामान्य जनतेच्या जीवीताच्या सुरक्षिततेसाठी त्यांना आपल्या आवडी निवडी , हौसमौज बाजूला ठेवून कर्तव्य व कर्तुत्व सिध्द करण्यासाठी आपली सेवा करण्यासाठी रूजू व्हावे लागत असते अशावेळी अशा कार्यक्रमांना इच्छा असुनही हजर रहाता येत नाही .पण न्हावा शेवा पोलिस ठाणे उरण येथील या महिला पोलिस भगिंनीनी विषेशता मानसी तांबोळी व त्यांच्या इतर सहकारी महिला पोलिस आपल्या खाकी वेशातील या सख्यांनी विविध क्षेत्रातली महिलांना एकत्रीत आणून त्यांना हळदीकुंकू चे वाण देउन सन्मानित करण्यात आले.
या हळदीकुंकू समारंभाचे औचित्य साधून उरण महिला सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या पदाधिकारी गौरी देशपांडे, सिमा घरत, अपशा मुकरी, संगीता पवार, तृप्ती भोईर, हेमा पाटील , नयना पाटील, कल्याणी दुख़ंडे, निलिमा थळी, नाहीदा ठाकुर, दिपा शिंदे अनिता घरत, सामिया बुबेरे, कांचन पाटील, संगीता पाटील, दक्षता कमिटीचे सर्वं सभासद इतर महिला उद्योजिका, बचत गट महिलांची उपस्थिती त्याचबरोबर ,इतर मैत्रीणीना एकत्र आणुन त्यांना याठिकाणी येऊन उत्तम मार्गदर्शनही मिळाले.
हळदीकुंकू च्या निमित्ताने दिलेल्या वाणात देवपूजा करण्यासाठी लागणारा कलश , एक फळ,फुल व अल्पोपहार याचा समावेश होता. प्रत्येक महिला पोलिस भगिनी अतिशय आनंदाने हे वाण देण्याचे काम करत होत्या. आणि दाखवून देत होत्या की आम्हाला देखील तुमच्या सारखे नटायला , सजायला आवडते पण नेहमीच कर्तव्य करत असताना वेळ मिळत नसतो पण तरीही खरच खुप उत्साहात हा कार्यक्रम पार पडत होता.
उरण महिला सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने सिमा घरत मॅडम यांनी आपल्या भाषणातून महिलांच्या अंगी धाडस, व कोणत्याही क्षेत्रात आज महिला अग्रस्थानी आहेत याविषयावर महिलांना प्रोत्साहन पर शब्दांत मोलाचे विचार मांडले. गौरी देशपांडे मॅडमने जरा वेगळ्या विषयावर आपले परखड मत मांडले. ते म्हणजे विधवा स्त्री च्या नावापुढेही सौ. या विशेषणांने तीचेही नाव सन्मानित करायचे आहे असे ठाम मत मांडले. विधवा महिलेच्या नावापुढे पतीचे नाव तर लागतेच मग नावापुढे सौ.लिहायला काय हरकत आहे?असा सवाल समाजापुढे केला आहे. त्यानंतर नाहीदा मॅम व हेमलता मॅडम यांनीही स्त्री च्या कर्तुत्व,हक्क, अन्याय, याबाबतीत जागृकता निर्माण होईल अशा विषयांवर वक्तव्य करून जमलेल्या महिलांच्या मनात चैतन्य निर्माण केले.
त्याचप्रमाणे या कार्यक्रमात अजून रंगत येण्यासाठी लकी ड्रॉ चाही खेळ खेळण्यासाठी जमलेल्या महिलांच्या नावाच्या चिठ्ठ्यांची सोडत पाणजे गावातील बालिका सना पाटील हिच्या हस्ते करून कार्यक्रमात मनोरंजकता निर्माण केली व ही लकी सोडत मनाली घरत या नववधू ने जिंकली मनाली घरतचाही न्हावा शेवा महिला पोलिस भगिनीं कडून साडी देऊन तीची ओटी भरण्यात आली.
नेहमीच्याच धावपळीच्या जीवनातील महिलांना हळदीकुंकू म्हणजे नटुनसजुन नीटनेटकेपणा सादर करण्याचा, आणि सौभाग्य जपण्याचा सण पण आजही या समारंभात विधवांना मिळणारी दुय्यम वागणूक कुठेतरी आपण महिलांनीच पुढाकार घेऊन हा समज पुसून टाकून त्यांनाही हळदीकुंकू समारंभात मानाचेच स्थान मिळाले पाहिजे असा विचार पुढे आला आणि तो अंमलात ही आणायला पाहिजे,आणि असा विचार भविष्यात विधवा महिलांना सुविसिनींच्या सोबतच मानपान मिळेल याची नांदीच आहे अस दिसत आहे.
हा उत्साहपूर्ण हळदीकुंकू समारंभ यशस्वी व आनंदात पार पडण्यासाठी न्हावा शेवा पोलिस ठाणे महिला पोलिस हवालदार मानसी तांबोळी, रोहीणी जाधव, देवयानी घरत,कनिष्का नाईक, जेनिफर जयराज, स्वाती देशमुख, सुवर्णा भोईर, मयुरी ओव्हाळ, महिला पोलिस शिपाई रेणुका शिंदे, किरण टिके, सिमा डोंगरे , यांनी फार मोठे योगदान दिले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *