ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सभागृह निःशब्द….प्रत्येकांच्या डोळ्यांतून अश्रु अनावर जिल्हाप्रमुख अंबेकरांचा उपक्रम राज्यात सर्वांसाठी दिशादर्शकच – राज्यमंत्री अब्दुल सत्तार

June 16, 202112:36 PM 64 0 1

जालना, दि. १४(प्रतिनिधी)- शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यात कोविड-१९ मुळे आधार गमविलेल्या कुटूंबियांना मदतीचा हात या अत्यंत भावपुर्ण कार्यक्रमाचे आयोजन अंबड रोडवरील मातोश्री लॉन्स येथे केले होते. यावेळी जिल्ह्यातील ५१ पात्र लाभाथ्र्यांना प्रत्येकी दोन कापूस बियाणांच्या बॅगा व ७ हजार रुपये रोख स्वरुपात राज्यमंत्री अब्दुल सत्तार, संपर्वâप्रमुख विनोद घोसाळकर, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, उपनेते लक्ष्मणराव वडले यांच्या हस्ते मदत केली. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार संतोष सांबरे, जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, माजी आमदार किशनचंद तनवाणी, माजी जिल्हाप्रमुख बाबासाहेब इंगळे, माजी सभापती भाऊसाहेब पाऊलबुध्दे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

यावेळी बोलतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर हे सातत्याने त्या-त्या परिस्थितीनुसार अत्यंत योग्य वेळी लोकोपयोगी उपक्रम राबवित असतात. त्यांच्या उपक्रमांचा जनतेला मोठा दिलासा मिळतो. मी त्यांच्या वेगवेगळ्या उपक्रमांना आवर्जुन उपस्थित राहत असतो. मागील काही दिवसांपुर्वी जालना येथे आलो असता त्यांनी मला त्यांच्या नवीन निर्माणाधिन असलेल्या घराच्या बांधकामावर नेले व मला सांगितले की, या घराच्या कामासाठी जमविलेल्या पैश्यातून मला कोविडमध्ये मृत्युमुखी पडलेल्या कुटूंबियांच्या परिवाराला मदत करायची आहे. त्यांनी त्यांचा शब्द आजच्या कार्यक्रमातून खरा करुन दाखविला. भास्करराव अंबेकर यांच्यावर आई-वडीलांप्रमाणेच शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार असल्याने ते नेहमी वेगवेगळ्या आपत्तीच्या वेळी जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. तसेच आपल्या कृतीतून ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के
राजकारण करतात असे सांगून त्यांनी जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या भरभरुन कौतुक केले तसेच शासनाच्या विविध योजना असतात त्यांचा लाभही सामान्य नागरिकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही राज्यमंत्री
अब्दुल सत्तार म्हणाले. याच कार्यक्रमात बोलतांना शिवसेना संपर्वâप्रमुख विनोद घोसाळकर म्हणाले
की, जालना जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख अंबेकर यांनी सुरु केलेला हा उपक्रम आज कोविडच्या काळात अत्यंत महत्वाचा आहे. कोविडमुळे अनेक कुटूंबच्या कुटूंब देशोधडीला लागले. अनेक कुटूंब त्यांचा कुटूंबप्रमुख गेल्याने अत्यंत आर्थिक अडचणीत आलेले आहेत. अशा अत्यंत दुःखाच्या प्रसंगी त्यांच्या पाठीशी उभे राहणे अत्यंत गरजेचे आहे. ही बाब
लक्षात घेवून अंबेकर यांनी जिल्ह्यातील काही कुटूंबियांना सध्याचा पेरणीचा काळ सुरु आहे. या काळात शेतकNयांना बियाणे, खत खरेदीसाठी पैश्याची अत्यंत आवश्यकता असते. परंतु घरातील कर्ता पुरुषच कोरोनाने गमावल्याने कुटूंबासमोर अडचणींचा डोंगर उभा आहे. अशा परिस्थितीत त्यांना उभे करण्यासाठी येत असलेली ही मदत अत्यंत अल्पशी असली तरी अत्यंत महत्वाची आहे. व योग्य वेळेवर आहे. हे अत्यंत महत्वाचे असल्याचे घोसाळकर सांगून यापुढेही जिल्ह्यात जिल्हाप्रमुखांनी नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना साथ द्यावी, असे सांगितले. अंबेकर यांनी राबविलेला हा उपक्रम जिल्ह्यासाठीच नव्हे तर राज्यातील कार्यकत्र्यांसाठी आदर्श उभा करणारा असल्याचे ते म्हणाले. यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले की, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर हे मागील ३५ वर्षांपासून कोणत्याही पदाची अपेक्षा न बाळगता सातत्याने जिल्ह्यात काम करीत आहेत. कोविड, दुष्काळ, अतिवृष्टी अशा संकटाच्या वेळी त्यांनी नागरिकांना दिलासा देणारे अत्यंत चांगले उपक्रम राबविले. जिल्ह्यात कोरोनाची चाहूल लागताच त्यांनी मास्क वाटप, सॅनिटाझर वाटप, भाजीपाला वाटप, अन्नधान्य वाटप, अन्न वाटप,अन्नछत्र, कोविड योध्दांचा सन्मान, असे अनेक उपक्रम राबवून जिल्ह्यात नागरिकांना दिलासा दिला. त्यांच्या उपक्रमांतून लोकांच्या मनात कोणी तरी आपल्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे भावना निर्माण झाली आहे. उपनेते लक्ष्मण वडले म्हणाले की, आमदार निलेश लंके यांनी केलेल्या कामांप्रमाणेच शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर हे सत्तेचे कोणतेही पद नसताना लोकोपयोगी काम करत असतात. त्यांनी आयोजित केलेल्या सर्वच कार्यक्रमांना मी आवर्जुन उपस्थित असतो. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबियांना मदत, उत्तराखंडमधील शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटूंबियांचा यथोचित सन्मान व मदत अशा अनेक कार्यक्रमांतून त्यांची समाजाप्रती असलेली बांधिलकी व त्यांच्या घरातील आई-वडीलांनी त्यांच्यावर केलेले संस्कार दिसून येतात. राज्यात कुणीही कोविडमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या कुटूंब प्रमुखांच्या कुटूंबियांना मदत केल्याचे पहिलेच उदाहरण असेल. राजकारणातील सत्तेचे कोणतेही पद त्यांच्याकडे नाही तरीही सातत्याने लोकांसाठी ते झटत असतात. असेही उपनेते वडले म्हणाले. याच कार्यक्रमात जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे, माजी आमदार संतोष सांबरे, नांदेडचे माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त करुन जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. या कार्यक्रमास किसान सेनेचे भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख पंडीत भुतेकर, रावसाहेब राऊत, भगवान कदम, मनिष श्रीवास्तव, रमेश गव्हाड, वैâलास चव्हाण, परमेश्वर जगताप, शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्करराव मगरे, महिला आघाडीच्या सविता विंâवडे, युवासेनेचे भाऊसाहेब घुगे, शिक्षण सेनेचे बालासाहेब आबुज, शहरप्रमुख विष्णु पाचपुâले, माजी शहरप्रमुख बाला परदेशी, शहरसंघटक दिपक रणनवरे, तालुकाप्रमुख संतोष मोहिते, हरिभाऊ पोहेकर, हरिहर शिंदे, जयप्रकाश चव्हाण, नवनाथ दौड, माधवराव हिवाळे, सभापती विमल पाखरे, माजी सभापती पांडूरंग डोंगरे, बजरंग बोरसे, वुंâडलिक मुठ्ठे, महेश पुरोहित, भुषण शर्मा, घनश्याम खाकीवाले, दुर्गेश काठोठीवाले, जिल्हा परिषद सदस्य बबनराव खरात, वैâलास पुंगळे, यादवराव राऊत, महिला आघाडीच्या गंगुताई वानखेडे, विजयाताई चौधरी, राधा वाढेकर, तालुका संघटक कांलिदा ढगे, आशा पवार,सिमा पवार, संगिता नागरगोजे, गंगाताई राजु जाधव, नगरसेवक अशोक पांगारकर, निखिल पगारे, विजय पवार, संदीप नाईकवाडे. विभागप्रमुख प्रभाकर घडलिंग, सखाराम गिराम, विष्णुपंत गिराम, हरिभाऊ शेळके, दिपक राठोड, भरत कुसुदल, सखाराम लंके, अनिल अंभोरे, मुसा परशुवाले, रामेश्वर कुरिल, योगेश रत्नपारखे, कांतराव रांजणकर, किसन राठोड, हरिभाऊ शेळके, माजी सभापती मुरलीधर थेटे, जनार्दन चौधरी, गणेश मोहिते, अशोक खलसे, तुळसीदास काळे, जगन्नाथ सिरसाट, संतोष खरात, विठ्ठलराव खरात, कडूबा इंदलकर, सर्जेराव शेवाळे, सुरज चव्हाण, बंडु केळकर, रामचंद्र पुâलझाडे, माजी पंचायत समिती सदस्य ब्रम्हा वाघ, संजु वाघ, तुकाराम डोंगरे, बालासाहेब जाधव, किशोर शिंदे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकत्र्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *