जालना/प्रतिनिधी : जालना तालुक्यातील मौजे घानेवाडी येथील पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीवरील वीज पंप जळाल्याने गेल्या आठवड्यात भरा पासून पाणी पुरवठा योजना गावात पाणी खंडीत असल्यामुळे, सध्या सर्वत्र शेतीची कामे सुरु असून, पावसाळ्याच्या तोंडावर पाण्या साठी येथील व लहान मुलांना वनवन फिरावे लागत असल्याने संतप्त महिलांचा ग्रामपंचायत कार्यालयावर व सरपंच राधाबाई पवार यांच्या घरावर आपला हंडा मोर्चा काढल्याचे पहावयास मिळाले याच दरम्यान महिला सरपंच यांच्या सुनेच्या व गावातली महिलांन मध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले, सरपंच, ग्रामसेवक याकडे लक्ष देत नसल्याने संतप्त महिलांनी आपला मोर्चा थेट ग्रामपंचायती कडे वळवला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
नादुरुस्त वीज पंप दुरुस्त करण्याकडे ग्रामसेविका श्रीमती धांडे, व महिला सरपंच यांचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष होत असल्याची खंत ग्रामस्थ प्रशांत घुले यांनी केली व्यक्त आहे, संतगाडगे बाबा जलाशयामुळे घानेवाडी गावाची ओळख आहे, घानेवाडी तलावाच्या परिसरात अनेक ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी असुन जालना शहराला पाणीपुरवठा सुद्धा याच गावाच्या तलावातून होतो मात्र आता चक्क याच गावच्या रहिवाशी यांना दोन हंडे पाणी आणण्यासाठी कसरत करावी लागत आहे असल्याने ही गावाची शरमेने मान खाली घालावी लावणारी बाब असल्याचे दिपक कावले मत व्यक्त केले आहे. आक्रमक पवित्रा घेतलेल्या महिलांना संध्याकाल पर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होईल असे आश्वसन दिल्याने महिलांनी यावेळी शांततेत घेतले, याबाबत ग्रामसेविका श्रीमती धांडे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही, यावेळी दिपक कावले (उपसरपंच ) रवि लोखंडे.(ग्राम पंचायत सदस्य) अजय लोखंडे. (ग्राम पंचायत सदस्य) कचरू पवार (ग्राम पंचायत सदस्य) सजंय खरात,सुरेश खडांळे,बाबासाहेब खडांळे, प्रशांत घुले, सुहास घुले, किरण पाटोळे, गोपाल कावले विलास कावले, व महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रतिक्रिया :
सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असल्याने कोरोना संसर्गाची भीती अजुन काही कमी झाली नाही त्यामूळे सार्वजनिक ठिकाणी पाण्यासाठी विहिरीवर होणारी गर्दी मुळे कोरोना होण्याची शक्यता खूप जास्त त्यामूळे त्वरित गावात पाणी पुरवठा करण्यात यावा यासाठी प्रयत्नशील.
दिपक कावले उपसरपंच घानेवाडी, गावकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या महिला ग्रामसेविका अलका धांडे यांची बदली करण्यासाठी आपण पाठ पुरावा आहे. सुरेश खंडाळे जिल्हाअध्यक्ष सा.न्याय.विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जालना
Leave a Reply