ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

माय लेकींच्या मृत्यूने चंद्रपूर हळहळलं; अन्नावाचून तडफडून सोडला प्राण

September 12, 202112:48 PM 59 0 0

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील एका गावातल्या माय लेकींचा अन्नावाचून तडफडून मृत्यू झाला आहे. गोंडपीपरी तालुक्यातील कोठारी येथे झेलाबाई पोचू चौधरी (वय 73) व तिची मुलगी माया मारोती पुलगमकर (वय 45) यांचा काल सायंकाळी मृत्यू झाला.


उपासमारीने मृत्यू
दोघींचा भूकेने आणि आजाराने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. राहत्या घरातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही वर्षांपूर्वीच पोचू चौधरी यांचं निधन झालं होतं. तेव्हापासून दोघी मायलेकी एकत्र राहत होत्या.
गेल्या अनेक महिन्यापासून या मायलेकी आजाराने ग्रस्त होत्या. त्यांच्याकडून कुठलीही कामे होत नव्हती. तसंच बऱ्याच वेळी त्यांना काही खायला देखील मिळत नव्हतं. मृत्यूच्या अगोदर काही दिवस पोटात अन्नही नसल्याची प्राथमिक माहिती आहे. ग्रा.पं. कार्यालयात याची माहिती मिळताच सरपंच मोरेश्वर लोहे व सहकारी घटनास्थळी पोचले.
मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना
पोलिस प्रशासनाला माहिती देत मृतदेहाचे पंचनामा करण्यात आले. यात संशयास्पद असे काहीही आढळून आलेले नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केले. ग्रामस्थांनी दोन्ही मृतदेह गावात पोचताच मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. कोठारी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दोघीही मायलेकी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करायच्या. कधी आई भिक्षा मागायची तर कधी लेक भिक्षुकीवरच त्यांची गुजराण व्हायची पण मधल्या काळात त्यांना दुर्धर आजाराने ग्रासलं जमिनीला खिळून राहिल्या  अखेर शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

चंद्रपूरमध्ये हत्येचा थरार
चंद्रपूर शहरात दोन मित्रांनी मिळून तिसऱ्या एका मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी पूर्ववैमनस्यातून ही हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. विशेष म्हणजे हत्या करण्याआधी आरोपींनी मृतकाला प्रचंड दारु पाजली. त्यानंतर त्यांनी आधीचा भांडणाचा विषय काढत वाद घातला. वाद चिघडल्यानंतर आरोपींनी मित्रावर चाकूने वार करत हत्या केली. पोलीस या प्रकरणी आणखी तपास करत आहेत.
आरोपींनीच पोलिसांना फोन करुन हत्येची माहिती दिली
चंद्रपूर शहरातील म्हाडा कॉलनीच्या निर्जन भागात युवकाची हत्या झाल्याची घटना आज (11 सप्टेंबर) उजेडात आली आहे. तिरवंजा गावी राहणाऱ्या संकेत सुमटकर याची 2 मित्रांनी जुन्या वादातून हत्या केल्याचे तपासात उघड झालंय. शुभम साखरकर आणि संगम सागोरे या दोघांनी ही हत्या केल्याचे प्राथमिक पोलीस तपासात उघड झालं आहे. विशेष म्हणजे आरोपींनी स्वतः पोलिसांना फोन करुन या हत्येची माहिती दिली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *