विकृतीचा कळस ! ३०नराधमांनी मिळून अल्पवयीन मुलीवर केले लैंगिक अत्याचार.राज्यात दिवसे दिवस महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे.नुकताच साकीनाका बलात्कार प्रकरणाने महाराष्ट्र हादरून निघाला होता.ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे.डोंबवलीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.डोंबवली पूर्वेला मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला.पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पिडीत मुलगी १४ वर्षांची अल्पवयीन आहे.आरोपींचा शोध सध्या सुरू आहे पोलीस सुत्रानी दिलेल्या माहिती नुसार बुधवारी सकाळी हा सगळा प्रकार उघडकीस आला.डोंबवलीच्या भोपर परिसरात ही घटना घडली आहे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल ३० आरोपीनी मिळून सामूहिक बलात्कार केला. मिळालेल्या माहिती नुसार अल्पवयीन मुलीच्या प्रियकराने जानेवारी मध्ये बलात्कार करताना व्हिडीओ काढला आहे.या व्हिडिओच्या आधारे मुलीला ब्लॅकमेल केले जात होते यानंतर मुलीला फार्म हाऊसवर नेऊन आरोपी कडून आळी पाळीने बलात्कार करणेत आलेले आहेत. बुधवारी हा सगळा प्रकार उघडकीस आला असून मानपाडा पोलिसा कडून कारवाई केली जात आहे.मागील काही दिवसांपासून पुणे पिंपरीत महिला अत्याचाराच्या उघडकीस येत असतानाच बनून शहरातील वानवडीत सामूहिक अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे.
एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक अत्याचार केल्याचे उघड जाळे आहे.देशात गतवर्षी दररोज सरासरी ७७ बलात्काराच्या तसेच ८० हत्येचे गुन्हे नोंदविले गेले.महाराष्ट्र हा बलात्कार प्रकरणामध्ये चौथा तर हत्येच्या घटना मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.कोरोना सारख्या महाभयंकर संकटाशी लढा सुरू असतानाच देशात महिला सुरक्षेचा मुद्धा या आकडेवारीच्या पुन्हा ऐरणीवर आला आहे एकदा तर कोल्हापुरात केवळ १८ महिन्याच्या बालिकेवर बलात्कार करून पशूला सुद्धा मानवाच्या कृत्याची लाज वाटेल अशी कृत्ये अशा नराधमांनी केलेली आहेत.ती कृत्ये करणा-याला जिवंत राहणेचा अधिकारच नाही.त्यांना भर रस्त्यात फाशीच देण्याची खरी गरज आहे.अरब देशामध्ये जशी कठोर शिक्षा दिली जाते तशीच शिक्षा देण्याची कृती करावी लागेल त्याशिवाय अशा नराधमा वर वचकच बसणार नाही.
वरील सर्व घडलेल्या घटनांचे मागे सर्व पुरुष जबाबदार आहेत.पण सर्व पुरुष विकृत नाहीत.त्या पुरुष्याच्या मनात अशा विकृत्या का निर्माण व्हाव्यात की,ज्या विकृती मुळे त्या पुरुषाला नाती-गोती, वय वेळ, काळ, पद, प्रतिष्ठा या प्रकारचे कोणतेच भान रहात नाही.त्या विकृत्या मनात का निर्माण झाल्या ? त्याला कोणती कारणे आहेत ? कोणती पाश्वभूमी जबाबदार आहे ? अशा विकृत्या निर्माण होण्यास काही अंशी सरकार जबाबदार आहे का ? काही प्रमाणात पुरुषच जबाबदार आहेत का ? बऱ्याच प्रकरणात सध्याचे माहिती तंत्रज्ञान, टी.व्ही., संगणक इंटरनेट सिस्टिम जबाबदार आहे ,का ? सध्याचे चित्रपट व त्यामध्ये काम करणाऱ्या या अभिनेत्री सुद्धा जबाबदार आहेत का ? वर्तमानपत्रात प्रकाशित होणारी अभिनेत्रीची भडक कमी कपड्यातील उत्थान दृष्ये कारणीभूत आहेत का ? मोबाईलवर दिसणाऱ्या अश्लील क्लिप्स जबाबदार आहेत का ?
वरील प्रकारचे एक नाअनेक प्रश्न मनात आवासून डोळ्यापुढे उभे राहतात. त्यामुळे पुरुष विकृत बनण्यास वरील सर्व कारणेच जबाबदार आहेत. समाज जबाबदार आहे.व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली दूरदर्शनवर दिसणारे अंगविक्षेप करणारी कमी कपड्यातील महिलांची दृश्य ही सुद्धा जबाबदार आहेत.आपण प्रत्येकाने आपल्या मनात वरील प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येईल की सध्याच्या समाजात बालिका पासून वृद्धापर्यंत सर्रास मोबाईलचा लहानांचे पासून वृद्धा पर्यंत अश्लील क्लिप्स डाउनलोड केल्यानंतर एका कडून दुसऱ्या मोबाईल मध्ये पाठविता येतात.हे माहिती तंत्रज्ञान विज्ञानाचे वरदान असले तरी वरील अश्लील क्लिप्स हे शाप आहे.यावर शासन बंदी कशी काय आणू शकणार आहे ? . .. ..अशा क्लिप्स काही अपवाद वगळता कॉलेज युवक युवती चोरून पहात असतात व अशा क्लिप्स पाहून पुरुषांच्या मनामध्ये विकृती निर्माण होत असाव्यात.एकदा विकृती निर्माण झाली की,तो नराधम पुरुष सावज शोधण्याचा प्रयत्न करीत असतो.त्यावेळी त्याच्या मनामध्ये वेळ काळ,पद,वय,नाते याचे कशाचेच भान रहात नसावे एकदा मनात आले की,त्याच्याकडून वरील अघोरी कृती घडत असते.
या पाश्वभूमीला कसे बंद करता येईल आपण समाजाने,सरकारने,विचार करण्याची गरज आहे.ती विकृती निर्माण होऊन निरपराध आपल्या महिलांचे बळी जाणर नाहीत.गुन्हेगाराला पकडून शिक्षा केली जाईल. म्हणून जी पाश्वभूमी जो पर्यंत आपण सर्व मिळून बदलण्यासाठी आवाज उठवत नाही. तोपर्यंत दिवसा ढवळ्या नाती गोती न पाहता हे घडतच राहतील. याचीच मनात भीती वाटत आहे.त्यामुळे भविष्यात माझ्या आया बहिणींना घरातून बाहेर फिरणे सुद्धा मुस्किल होणार आहे की काय ? पालक आपल्या मुलींना शिक्षणाचे पासून वंचित ठेवू शकतील.कोणत्याही प्रकारची समाजात स्त्री जिला आपण आदिमाया शक्ती समजतो ती शक्तीहीन झालेली दिसेल.अशी भीती वाटत आहे.ती विकृती निर्माण होण्याची जी कारणे आहेत त्याचे आपण समूळ उच्चाटन केले पाहिजे.ती कारणे आपण शोधून काढली पाहिजेत. त्याचा शोध घेऊन सरकारला त्यावर उपाय करण्यासाठी कायदे करण्याची सुद्धा गरज निर्माण झालेली आहे.त्यासाठी सरकारच्या आपण लक्षात आणून देणे गरजेचे आहे. समाजातील लोकानी केवळ बघ्याची भूमिका न घेता अशा नराधमास पकडून देण्यासाठी पोलिसांना मदत केली पाहिजे.
“जलदगती न्यायालयांची संख्या वाढवून आरोपीला त्वरित शिक्षा कशी मिळेल याचा प्रयत्न झाला पाहिजे. वेगवेगळ्या दूरदर्शनच्या मालिका मध्ये काम करणाऱ्या महिला,चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या महिला,दूरदर्शन वाहिन्यांच्या निवेदिका अत्यंत कमी कपड्यात असतात.याला काही अपवाद असू शकतात.चित्रपटावर लक्ष ठेवणारे सेन्सॉर बोर्ड असते मग अशी कमी कपड्यात नायिकाच का म्हणून दाखवित असतात ? चुंबन दृश्य दाखविण्यावर बंदी आणली पाहिजे. ही सर्व विकृती निर्माण करण्याची पाश्वभूमि आहे असेंच म्हणावे लागेल.या सर्व वरील करणाविषयी कोणी आज पर्यंत स्पष्ट बोलणार आहात की नाही?सरकारला हे पटवून देण्याची गरज आहे. ज्या वेळी माझी आई ,बहीण ,मुलगी,त्या विकृत प्रवृत्तीच्या शिकारीला बळी पडतात,आयुष्यातून उठल्या जातात, स्वतःच्या जीवाला मुकतात यासाठी अशा प्रवृत्ती निर्माण होण्याची एक पेक्षा अनेक कारणे आहेत.या कारणांचा शोध घेतला पाहिजे त्यासाठी लोकांचे शाळा महाविद्यालयातून प्रबोधन किंवा समुपदेशन केले तर भविषयात नक्कीच महिलांवरील होणारे अत्याचार कमी होतील.बलात्कार करणारे नराधम या समाजातीलच कोणाचा तरी मुलगा,भाऊ, पती,वडील असतो.एवढेच करून न थांबता दंडात्मक जरब बसविणेसाठी जन्मठेप,फाशी सारख्या कठोरात कठोर शिक्षा सुद्धा दिल्या पाहिजेत नाही तर केवळ गृहमंत्री बदला,त्यांना बांगड्यांची आहेर पाठवा किंवा भेट पाठवा हा महिलांचाच अवमान केल्यासारखे होईल. कारण आदिमाया शक्ती महिष्यासूर मर्दिनी,झाशीची राणी,अहिल्याबाई होळकर,इंदिरा गांधी ,सावित्रीबाई फुले, मार्गारेट प्रतिभाताई पाटील यांनी बांगड्या परिधान केलेल्या आहेत.यांनी उच्च पदावर काम केलेल आहे.त्यांचा अपमान होईल.त्यासाठी विकृत कारणांचा शोध घेतला पाहिजे.विकृत प्रवृत्तीचाच नाश केला पाहिजे अन्यथा निरपराध महिलांचे, बालिकेचे बळी दिल्ली ते गल्ली पर्यंत जातच राहतील.त्यासाठी अशा ” बलात्का-यांना फासावर लटकवा ” तरच पुढच्यास ठेच मागचा शहाणा होईल.
लेखक
जी एस कुचेकर पाटील
भुईंज तालुका वाई जिल्हा सातारा
मो.न.७५८८५६०७६१.
Leave a Reply