ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

निर्दयी पित्याला फाशीवर लटकवा

October 6, 202115:08 PM 47 0 1

औषध उपचाराचा खर्च परवडत नसल्याने पाच वर्षांच्या मुलाला नदीपात्रात फेकले.निर्दयी पित्याचे कृत्य.औषध उपचाराचा खर्च परवडत नसल्याच्या कारणा वरून कबनुर ता.हातकनगले येथील निर्दयी पित्याने आपल्या पाच वर्षाच्या मुलाला पंचगंगा नदीत फेकल्याची हृदय द्रावक घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे.या प्रकरणाची खुद्द बापानेच पोलीसां समोर कबुली दिलेली आहे अफान सिंकदर मुल्ला वय वर्षे ५ राहणार पंचगंगा साखर कारखाना रोड कबनुर असे दुर्दैवी मुलाचे नाव आहे सिंकदर हुसेन मुल्ला वय वर्षे ४८ या पित्यास शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.रात्री उशिरा पर्यंत नदीपात्रात मुलाचा शोध घेण्याचे काम सुरू होते.
कबनुर येथील सिंकदर मुल्ला हे मोलमजुरी करतात.त्यांना दहा वर्षांची मुलगी व पाच वर्षाचा अफान अशी दोन मुले आहेत.अफानला फिट्सचा आजार असून घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने औषध उपचारा वरील खर्चाच्या कारणावरून त्यांच्या कुटूंबात सतत वाद उदभवत होता.काही दिवसांपूर्वी सिंकदर हे दोन दिवस घरा बाहेरच होते.ते घरी परतल्या नंतर नातेवाईक यांनी त्याला खडे बोल सुनावले होते.त्यात आधीच मुलाच्या औषध उपचाराच्या खर्चाने त्रस्त सिंकदर कुटूंबा तील वादाने वैतागले होते.गुरुवारी सांयकाळी अफानला उपचारासाठी घेऊन जायचे आहे असे सांगून ते सायकलवरून घरा बाहेर पडले.रात्री उशिरा ते एकटेच घरी परतले.अफानला आपण पंचगंगा नदीत फेकल्याचे त्यांनी नातेवाईकाला सांगितले.त्याच्या बोलण्यावर सुरुवातीस नातेवाईक व शेजाऱ्यांना विश्वास बसला नाही.परंतु ते वारंवार सांगू लागल्याने अखेर त्यांना शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.पोलिसांनी सिंकदरला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असता अफान याला मोठ्या पुला वरून पंचगंगा नदीपात्रात फेकल्याचे सांगितले.शिवाजीनगर पोलीस मध्यरात्री सिंकदरला घेऊन पंचगंगा नदीपुलावर आले असता त्याने अफान याला फेकून दिल्याचे ठिकाण दाखविले.त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटना स्थळाला भेट दिली.शुक्रवार सकाळ पासून अफानचा शोध घेण्याचा प्रयत्न पट्टीच्या पोहणाऱ्यांनी यांत्रिक बोटीद्वारे सुरू केला.नदीपात्रा पासून ३ की.मी.चे अंतर सायंकाळ पर्यंत शोधण्यात आले. पथकाच्या हाती काहीच लागले नाही अफानला खरोखरच नदीपात्रात फेकण्यात आले आहे का ? याचाही उलगडा होत नसल्याने पोलीसहि चक्रावले आहेत.फिट्सच्या आजाराचा उपचार खर्च परवडत नसल्याच्या कारणा वरून सिंकदरने पोटच्या मुलाला नदी पात्रात फेकून दिल्याचे कृत्य हृदय द्रावक म्हणावे लागेल.किरकोळ आजाराचा खर्च असताना सिंकदरने असे टोकाचे पाऊल उचलण्या मागे आणखी एखादे कारण असू शकते का याचाहि तपास पोलीस करीत आहेत.


ही बातमी वाचून मन दुःखी झाले.
काय चुकी होती त्या निष्पाप केवळ पाच वर्षाच्या बालकाची ? काय तर त्यास फिट्स येत होती.फिट्स येणे हा त्या बालकाचा शारीरिक रोग होता त्यात त्याची काय चूक होती.त्या रोगाचा उपचार करण्यासाठी बापाला सारखा खर्च येत होता.पण आई वडिलांनी मुलांना जन्म दिल्या नंतर त्यांचे पालन पोषण करणेची सर्व जबाबदारी ही आई वडिलांची असते.जर पालन पोषण याचा अर्थ आपला मुलगा आजारी पडला तर त्याची सर्व जबाबदारी आई वडिलांचे वर असते.अप्रत्यक्ष त्या कुटुंबाचा प्रमुख कुटूंबकर्ता म्हणून बापाचीच जबाबदारी असते.आपल्या मुलांचे संगोपन नीट करू शकत नसतील तर समाजातील लोक सहज प्रश्न विचारत असतात की यांना जन्माला तरी कशाला घातली ? पण मूलं सुद्धा जास्त नाहीत एक मुलगी आणि एक मुलगा केवळ दोनच मूलं होती.मुलाच्या औषधांचा खर्चासाठी कोणाकडे आपली अडचण सांगितली असती तरी समाजा मधील काही दानशूर लोकानी सढळ हाताने मदत केली असती कारण आजही समाजात माणुसकी जिवंत आहे लोक अशा वेळी मदत करतात.पण अशी कोणतीच कृती न करता त्या असहाय्य मुलालाच नदी मध्ये फेकून आपली जबाबदारी झटण्याचा प्रयत्न केलेला हा अविचारी आहे पण हा आपणा कडून आपल्याच जन्म दिलेल्या बाळाचा निर्दयी जीव घेत आहोत आपण गुन्हेगारी कृती करत आहोत.त्याची शिक्षा आपणास मिळणारच आहे.आपणास फाशी सुद्धा होऊ शकते एवढा हा मोठा गुन्हा केलेला आहे. (१)एका पिंपरीतील आई वडिलांनी त्यांच्या मुलीसाठी १६ कोटी रुपये खर्च येणार आहे तर त्यांना आपल्या देशातीलच नव्हेतर परदेशातून सुद्धा मदत मिळवली सोळा कोटी रुपये जमा झालेले होते ती मुलगी तर केवळ अडीच वर्षाची होती.पण तिला द्यावे लागणाऱ्या इंजेक्शनची किंमत सोळा कोटी रुपये होती महागडे इंजेक्शन अमेरिकेतून आणून उपचार केले.सांगायचे तात्पर्य आपण मागणी केली तर लोक मदत करत असतात. पण आई वडील तिच्यासाठी शेवट पर्यंत झगडत होते.असे धीर खच्चून हातपाय गाळून बसले नाहीत किंवा तिला खल्लास करण्याचा त्यांच्या मनात विचारहि कधी आला नाही. याठिकाणी त्या असहाय्य मुलाची त्याच्या नाका तोंडात पाणी जाऊन त्याचा श्वास गुदमरून जाऊन शेवटची घटका मोजत असतानाची काय अवस्था झालेली असणार त्याची कल्पनाच न केली बरी,तो म्हणत असेल अशा बापाने जन्म तरी मला कशाला दिला ? मला मारून टाकायचे होते तर जन्माला तरी कशाला घातले. अशा बापाला बाप तरी का म्हणावे ?असे एक ना अनेक प्रश्न त्या कोवळ्या जीवात निर्माण झाले असतील . समाजात अजून माणूसकी जीवंत आहे परवा(२) एका गरीब हुशार सोनाली वाघमारे या मुलीला केवळ पैसे नसल्या मुळे नर्सिंगच्या कोर्सला प्रवेश घेता येत नव्हता तिचे वडील मयत झालेले होते लोकांना मदतीचे आव्हान केले हजारो मदतीचे हात पुढे आले लोकांनी मदत केल्यामुळे मुलीला नर्सिंग कोर्सला बार्शी येथे प्रवेश मिळाला आहे ती मुलगी शिकत आहे. (३) दुसरे उदाहरण आजच वाचनात आले ” वडील कोरोनात मृत्यू झाल्यावर दोन महिन्याने जन्माला आलेल्या गौरीसाठी निधी जमविण्याचे सोशल मीडियात आवाहन केल्यावर “गुगल पे “वर दिड लाख रुपये जमले,
त्याचे किसान विकास पत्रात गुंतवणूक करून गावाच्या साक्षीने तिच्या आईला गावच्या महिला सरपंच यांच्या हस्ते तांभोळ येथे गावकऱ्यांच्या साक्षीने प्रदान करण्यात आले.दोन दिवसात एवढी रक्कम जमली. केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे.अशी अनेक उदाहरणे वाचनात आलेली आहेत.पण येथे आपल्या पाच वर्षाच्या मुलाला नदीत फेकणाऱ्या” निर्दयी पित्याला फाशीवर लटकवा “.तरच भविष्यात अशा घटनां घडणार नाहीत. “पुढच्यास ठेस मागचा शहाणा होईल ”
लेखक
जी.एस.कुचेकर पाटील
भुईंज तालुका वाई जिल्हा सातारा
मो.नं.७५८८५६०७६१.

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *