ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

वाढदिवसानिमित्त व्यक्तीगत न भेटता व्हॉटसअप, फेसबुकव्दारे शुभेच्छा स्विकारणार ः आ. गोरंट्याल

April 8, 202113:35 PM 5 0 0

जालना (प्रतिनिधी) ः करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि जिल्हा प्रशासनाकडुन लागु करण्यात आलेल्या निर्बंधाच्या पार्श्‍वभुमीवर उद्या दि. 9 एप्रिल शुक्रवार रोजी आपल्या असलेल्या वाढदिवसानिमित्त कुणीही व्यक्तीगत भेटण्याचा प्रयत्न करु नये. व्हॉटसअप, फेसबुक, भ्रमणध्वनीव्दारे शुभेच्छा स्विकारणार असल्याचे महाराष्ट्र विधीमंडळ आश्‍वासन समितीचे अध्यक्ष आ. कैलास गोरंट्याल यांनी कळविले आहे. या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आ. गोरंट्याल यांनी म्हटले आहे की, जालना शहर व जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

 

करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने काल दि. 6 ते 30 एप्रिल पर्यंत जिल्ह्यात कडक निर्बंध लागु केले आहेत.  या पार्श्‍वभुमीवर उद्या दि. 9 एप्रिल शुक्रवार रोजी आपल्या असलेल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, उद्योजक, व्यापारी,विविध सामाजिक, क्रिडा, सांस्कृतिक संघटनांचे पदाधिकारी, जिल्हा परीषद, पंचायत समिती, नगर परिषदेचे आजी माजी सदस्य, पदाधिकारी आणि हितचिंतकांनी प्रत्यक्ष न भेटता व्हॉटसअप, फेसबुक, भ्रमणध्वनीव्दारे शुभेच्छा द्यावात. तसेच आपल्या वाढदिवसानिमित्त जालना शहरातील कॉग्रेस पक्षाचे आजी माजी नगरसेवक, सभापती, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांकडुन आयोजित करण्यात आलेले विविध उपक्रम व कार्यक्रम जिल्हा प्रशासनाने घालुन दिलेल्या अटी व नियमाचे पालन करुन पार पाडावेत असे आवाहन देखील आ. गोरंट्याल यांनी केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *