ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected]m या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

नववर्षाचे स्वागत करा,जरा जपुन!

December 28, 202112:17 PM 72 0 0

2020 मध्ये करोना महामारीने भारतासह संपूर्ण जगात पाय पसरवीले.या नंतर 2021 मध्ये करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने उग्र रूप धारण केले.यात लाखोंच्या संख्येने मोठ्या प्रमाणात जिवीत हानी झाली.अनेकांचे संसार उद्धवस्त व अनेकांनी आपले आप्त-नातेवाईक गमावीले.करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेतुन भारतासह संपूर्ण जग सावरू लागला तोच ओमिक्रॉनने पाय पसरविण्याला सुरूवात केल्याचे दिसून येते.म्हणजेच करोना महामारीने अजुन पर्यंत मानवजातीचा पीच्छा सोडलेला नाही.2021 च्या सरत्या शेवटी ओमिक्राॅनने प्रवेश केला.परंतु 2022 च्या नवीन वर्षात ओमिक्राॅन उग्र रूप धारण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे भारतासह महाराष्ट्रातील नागरिकांनी 31 डिसेंबर 2021 ला निरोप देतांना व नवीन वर्षाचे स्वागत करतांना करोना महामारीच्या संपूर्ण नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.नवीन वर्षाचे स्वागत करतांना गर्दी करू नये, वाढत्या दुर्घटना पहाता मद्यपिवुन गाडी चालवु नये,जास्त जल्लोष टाळला पाहिजे.ओमिक्रॉनचा धोका पहाता सर्वांनीच आपल्या घरी बसूनच नवीन वर्षाचे स्वागत करावे,मास्कचा वापर करावा.कारण पुढे चालून परिस्थिती गंभीर होणार नाही याकरिता स्वत:वर सर्वांनीच नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.आता करोणाच्या तिसऱ्या स्ट्रेन्थने प्रवेश केला आहे त्यामुळे प्रत्येकांनी सावध रहाणे गरजेचे आहे.2020 व 2021 ने संपूर्ण जगाला दु:खाच्या सागरात लोटले. यात आतापर्यंत करोना महामारीने जगात 54 लाख लोकांचा बळी गेला तर भारतात 4 लाख 80 हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले.करोणा संक्रमणामुळे अनेक हासते-खेळते परिवार उध्दवस्त झाले व अनेकांचा रोजगार गेला.यामुळे जगावर आर्थिक संकट ओढवून आले.

भारतासह संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था ढासळली.संपुर्ण जग शांततेने जीवन जगत होते.परंतु करोणाच्या रूपाने चीनने विषाणू पसरवून मृत्यृचे तांडव निर्माण केले.करोणा महामारीचे वाढते मृत्यू तांडव पहाता संपूर्ण जग हादरून गेले.यावर औषध काढण्याकरिता संपूर्ण जग एकवटला.प्रत्येक देश आपल्या परीने व्हॅक्सीन किंवा औषध काढण्याकरिता चुरशीचे प्रयत्न करू लागले.तब्बल एक वर्षानंतर करोणावर व्हॅक्सीन निघाली.सन 2020 अमेरिकेच्या इतिहासातील मृत्यू तांडवाचे वर्षे मानल्या जात आहे.2020 च्या करोणा कारस्थानामुळे जगात एवढी उथल-पुथल झाली आहे की तिसरे महायुद्धाची शक्यता वर्तवली जात होती.2020 व 2021 यावर्षात करोणा महामारीने एवढी बिकट समस्या उभी केली की बेरोजगारी, कुपोषण,भुकमरी, आत्महत्या सारख्या महाभयानक परीस्थिती मोठ्या प्रमाणात वाढल्या दिसून आले. करोनामुळे 2020 व 2021 यावर्षात आप्त-नातेवाईक यांच्यात कटुता निर्माण झाली व कोनीही एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होवू शकले व सोशलडिस्टंसीगचा फार्मुला संपूर्ण जगात अमलात आला.परंतु 2020 व 2021 यावर्षात लॉकडाउन काळात निसर्गाने व जंगलातील वन्यप्राणी यांनी खुला स्वास घेतला.परंतु करोणा काळात मानवासोबतच पाळीव प्राण्यांची सुध्दा मोठ्या प्रमाणात जिवीत हाणीसुध्दा झाली.2020 व 2021 यावर्षात मानवाची व निसर्गाची दीनचर्या यात मोठ्या प्रमाणात बदलाव दिसून आला.अशा प्रकारे 2020 ने व 2021 ने जगासाठी दु:खाचा डोंगर उभा केला.करोना महामारीने आपल्याला बरेच काही शिकवीले.वाढते प्रदुषण पहाता सर्वांनीच मास्क लावने गरजेचे आहे, लग्नसमारंभाच्या मर्यादेचे पालन करून वाढता खर्च कमी झाला,बाहेरच्या खाण-पाणावर कंट्रोल ठेवने, लोकांच्या खानपाणात नियंत्रण आल्यामुळे अनेकांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्या म्हणजेच करोणाने जेवढे दु:ख दीले त्यापेक्षा जास्त शिकवीले सुध्दा.जगातील कोणतीही महामारी असो, वाढते प्रदुषन, ग्लोबल वॉर्मीग,जंगल तोड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर,परमाणु परीक्षण, पृथ्वीवरील वाढता दारूगोळा इत्यादी अनेक कारणांमुळे पृथ्वीचे संतुलन डगमगत आहे.याचे प्रायचीत्य जगातील संपूर्ण जीव सृष्टीसह,मानव,जीव-जंतु भोगत आहे आणि या संपूर्ण घटनेला जबाबदार आहे फक्त मानवजातीच मग ती कोणत्याही देशाची असो.म्हणेच आज मानवाने स्वत:हुन “मौत का कुंवा”खोदुन ठेवला आहे.करोणा महामारी ही मानवाचीच देन आहे.म्हणजेच आज मानवाने स्वत:च्या स्वार्थासाठी जगाचे वाटोळे केले आणि मृत्यूला कवटाळण्यासाठी “आ बैल मुझे मार”अशी परिस्थिती करून ठेवली आहे.त्यामुळे जगाने करोणा महामारीपासुन काहीतरी धडा घेतला पाहिजे व निसर्गाचे संतुलन स्थीर ठेवण्यावर जोर दिला पाहिजे.2020 व 2021 ने जगाच्या प्रत्येक देशांना अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या जखमा व घाव घातले.या जखमा भरून काढण्याची संपूर्ण मानवजात एकवटली पाहिजे व 2022 चे स्वागत केले पाहिजे. जनतेला मी आग्रह करतो की 2022 आला म्हणून हवेत उडु नका कारण करोनाचा धोका टळलेला नसुन ओमिक्रॉनच्या रूपात प्रवेश केलेला आहे.त्यामुळे प्रत्येकांनी आपल्या लसीचे डोस पुर्ण करण्याला प्राधान्य दिले पाहिजे.कारण ओमिक्रॉनच्या तिसरी स्ट्रेन्थने जगातील 108 देशांना घेरले आहे व जगभर पसरत आहे.त्यामुळे सोशलडिस्टंसीग,मास्कचा वापर या गोष्टी काळजी पुर्वक करने गरजेचे आहे.2020 व 2021 ने मंदिर-मज्जीद,गुरूव्दारा,चर्च, बौद्ध विहार इत्यादी अनेक धार्मिक देवस्थान व पर्यटन स्थळांपासुन जगातील संपूर्ण मानवजातीला दुरावले गेले.2020 व 2021 ने संपूर्ण विश्वाचाच “विश्वासघात”केला आहे. परंतु आतातरी चीन असो किंवा आणखी कोणताही देश असो त्याने अतीरेक करने सोडले पाहिजे व 2022 मध्ये विश्र्वामध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी संपूर्ण विश्व एकवटला पाहिजे तेव्हाच मानवजातीची मानुसकी दिसून येईल.अन्यथा मानवाची तुलना राक्षस जातींमध्ये केल्या जाईल.चीनच्या विस्तारवादी नितीने मानवजातीला कलंकित केले आहे आणि आताही चीन विनाशकारी व्हायरस तयार करीत आहे.चीनने महाशक्ती बनण्याच्या उद्देशाने 2020 मध्ये करोणाच्या रूपाने महामारी तयार केली.आणी ही महामारी एवढी टोकाला जाऊन पोहोचली आहे की प्रत्येक देशाने चीनला तीरप्या नजरेने पाहत आहे व संपूर्ण देशांनी मोठ्या प्रमाणात परमाणु बॉम्ब सह अत्याधुनिक हतीयाराचा जखीडा तयार केला आहे.यामुळेच जगात तिसरे महायुद्ध केव्हाही भडकु शकते याला नाकारता येत नाही.त्यामुळे 2022 या नवीन वर्षात प्रवेश करतांना करोणा महामारी, ओमिक्रॉन व इतर परिस्थिती पाहता सर्वांनीच सावधगिरी बाळगली पाहिजे व नवीन वर्षाचे स्वागत साधेपणाने साजरे केले पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे.नववर्षाच्या निमित्ताने भारतासह महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने एक वृक्ष लावुन लावुन स्वागत करावे.यामुळे प्रदूषणावर मात करता येईल.महाराष्ट्रातील ओमिक्रॉनचा धोका पहाता नवीन वर्षाच्या निमित्ताने सर्वांनीच जागरूक व सावध असले पाहिजे.नवीन वर्षाचे स्वागत सर्वांनीच अवश्य केले पाहिजे परंतु जपून!आपण सर्वांनीच शपथ घेतली पाहिजे की नवीन वर्षात नवीन संकल्प, नवीन उमंग, नवी आशा, नवीन दिशा निर्माण व्हावी याच उद्देशाने पुढचे पाऊल टाकावे व येणाऱ्या महामारीला रोखण्यासाठी सर्वांनीच कटीबद्ध रहाले पाहिजे.त्याचप्रमाणे राज्य सरकारने घालून दिलेल्या संपूर्ण नियमांचे काटेकोर पालन करावे.

लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार.
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर)
मो.नं.9921690779

 

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *