जालना प्रतिनिधीः जागतिक चहा दिनाचे औचित्य साधून भाजप सांस्कृतिक सेलच्या वतीने रेल्वेस्टेशन रस्त्यावर गत 35 वर्षांपासून एक छोटेखानी टपरीवजा हॉटेल चालवून जिद्दीने संसार चालविणार्या व परिस्थितीशी दोन हात करणार्या शकुंतला ठाकूर-कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.
सांस्कृतिक सेलच्या जिल्हाध्यक्षा शुभांगी देशपांडे यांच्यासह इतर महिलांनी हॉटेलला मंगळवारी भेट देऊन त्यांची माहिती जाणून घेतली. याप्रसंगी शुभांगी देशपांडे यांनी शकुंतला ठाकूर-कुलकर्णी यांचा साडी तसेच भेटवस्तू देऊन सत्कार केला. तत्पूर्वी देशपांडे यांनी भारतीयांमध्ये चहाचे असलेले महत्त्व विषद करून एका महिलेने गत 35 वर्षांपासून चालविलेले चहाचे हॉटेल प्रेरणादायी असल्याचे सांगितले. चिंचेच्या सावलीखाली चहा मधून आपलेपणा ,जिव्हाळा मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी मालती जोशी, वृंदा अग्निहोत्री,ज्योती देशपांडे,तारा बनकर,लक्ष्मी वाघमारे, राखीताई, निलीमा देशपांडे, अपर्णा राजे, अरुणा फुलमामडीकर,दीपा बिन्नीवाले,रश्मी फुलमामडीकर, रेखा काकडे, अशोक कुलकर्णी,संजय देशपांडे,अमित कुलकर्णी,अनिल देशपांडे आदींची उपस्थिती होती.
Leave a Reply