ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

हाथरस प्रकरण : आरोपींवरील चार्जशीटनंतर प्रियंका गांधींची प्रतिक्रिया

December 18, 202019:49 PM 154 0 0

उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सीबीआयनं चारही आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार आणि हत्येचा आरोप लावला आहे. सप्टेंबर महिन्यात हाथरसमध्ये झालेल्या या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. तीन महिन्यांनी सीबीआयकडून आरोपींविरोधात बलात्कार आणि हत्येचा आरोप लावला. सीबीआयने आरोपींविरोधात हाथरसमधील न्यायालयात चार्जशीट दाखल केली आहे. दरम्यान, यानंतर काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी सत्यमेव जयते असं म्हणत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“एकीकडे सरकारचा अन्याय होता. तर दुसरीकडे कुटुंबीयांना न्यायाची अपेक्षा होती. पीडितेचं पार्थिवावर जबरदस्ती अंत्यसंस्कार करण्यात आले. पीडितेला जबरदस्ती बदनाम करण्यात आलं. तिच्या कुटुंबीयांना धमकावण्यात आलं. परंतु अखेरिस सत्याचाच विजय झाला. सत्यमेव जयते,” असं प्रियंका गांधी म्हणाल्या. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

काय आहे प्रकरण?

हाथरसमद्ये १४ सप्टेंबरला २० वर्षीय दलित तरुणीवर चार जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. दिल्लीमध्ये रुग्णालयात उपचार सुरु असतानाच पीडितेचा मृत्यू झाला. ३० सप्टेंबरला घराजवळ पोलिसांच्या सुरक्षेत पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले होतं. रात्रीच्या अंधारात उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडितेवर अंत्यसंस्कार केले होते. कुटुंबाची परवानगी नसतानाही अंत्यसंस्कार झाल्याने मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त झाला होता. यासोबतच पोलिसांच्या भूमिकेवरही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. पोलीस मात्र कुटुंबाच्या इच्छेनुसारच सर्व काही करण्यात आल्याचा दावा केला होता. ऑक्टोबर महिन्यात सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद कोर्टाच्या देखरेखेखाली सीबीआय तपास करेल असा आदेश दिला होता.

मुख्य आरोपीने उत्तर प्रदेश पोलिसांना जेलमधून पत्र लिहिलं होतं ज्यामध्ये त्याने आपण आणि आपल्या मित्रांना या प्रकरणात अडकवलं जात असून न्याय देण्याची मागणी केली होती. पीडितेची आई आणि भाऊ आपल्याला त्रास देत असल्याचा दावाही त्याने केला होता. पीडितेच्या कुटुंबाने हे आरोप फेटाळले होते. दरम्यान सीबीआयने तपास पूर्ण कऱण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाकडे अतिरिक्त वेळ मागितला होता. २७ जानेवारीला न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे.

Categories: राष्ट्रीय
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *