ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कातकरी उत्थान योजने अंतर्गत आदिवासी बांधवांसाठी रानसई येथे आरोग्य शिबिर

February 25, 202213:58 PM 39 0 0

उरण( संगिता पवार )- रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शक सुचने नुसार कातकरी आदिवासींसाठी कातकरी उत्थान योजना राबवून त्यांना त्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मंगळवार ता.22 रोजी रानसई येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आदिवासींना कोव्हीड 19 चे लसीकरण देखिल करण्यात आले. यामध्ये एका व्यक्तीला पहिला डोस तर 79 आदिवासींना दुसरा डोस देण्यात आला. 51 लहान मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली तर 102 प्रौढ व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराला उरणचे तहसिलदार भाऊसाहेब अंधारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजेंद्र इटकरे, मंडल अधिकारी सी.आर. पाटील, तलाठी भाऊ सिलकर आदि उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *