ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आरोग्य हीच खरी संपत्ती – डॉ. संजय राख युवकांना प्रेरणा देणारा उपक्रम – माजी उपनगराध्यक्ष राजेश राऊत

March 13, 202212:01 PM 39 0 0

जालना (प्रतिनिधी)-आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये अनेक जण शारीरिक व्यायाम करण्याचे टाळताना दिसतात. परंतु असे केल्यामुळे अनेक आजारांना आपण निमंत्रण देत असतो. खNया अर्थाने तंदुरुस्त राहावयाचे असल्याचे शारीरीक व्यायाम अत्यंत गरजेचे आहे. स़दृढ शरीर हीच खरी संपत्ती असल्याचे प्रतिपादन डॉ. संजय राख यांनी केले. जालना शहरातील क्रीडा,आरोग्य अर्थ,शिक्षण या क्षेत्रात कार्य करणाNया व्यक्तींचा प्रतिनिधीक स्वरुपात संभाजीनगर प्रभागातील शांतिनिकेतन विद्या मंदिर या शाळेत अश्विन भास्करराव अंबेकर मित्र मंडळाच्या वतीने गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात जालना पिपल्स बँकेच्या व्हा.चेअरमनपदी सुभाष वाघमारे, क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करुन विभागीय व राज्यस्तरावरील विविध पुरस्कारांचे मानकरी शेख चाँद पी.जे., बॉडी बिल्डींग क्षेत्रात अनेक वर्षांपासून सक्रीय राहून तरुणांना घडविणारे महेश तलरेजा,जेईएस महाविद्यालय जालना येथून नुकतेच सेवानिवृत्त झालेले प्रा. राम कदम, श्रीकांत अहिरवाल, सनी पारचा, विकी राजपुत, मनोज मुळेकर, आनंद गायकवाड, गितेश राजपुत यांचासह बॉडी बिल्डींग क्षेत्रातील मान्यवरांचा यथोचित गौरव दिपक हॉस्पीटलचे संचालक डॉ. संजय राख, माजी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, शिवसेना शहरप्रमुख विष्णु पाचपुâले यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी दिपक हॉस्पीटलचे संचालक डॉ. संजय राख बोलतांना केले. यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, शरीर सौष्ठव स्पर्धांच्या माध्यमातून जालना शहरातील अनेक तरुण या स्पर्धेच्या तयारीनिमित्ताने आरोग्याची काळजी घेत असल्याचे पाहून निश्चितच आनंद वाटला. अश्विन भास्करराव अंबेकर यांनी अशा क्रिडा क्षेत्रातील खेळाडूंचा गौरव करण्याचा उपक्रम घेवून तरुणांना प्रेरणा देण्याचे काम केले असल्याचे सांगून या तरुणांचा आदर्श घेवून विद्याथ्र्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेवून आपले शरीरही सदृढ ठेवावे, असे आवाहन डॉ. राख यांनी युवकांना केले. यावेळी बोलतांना माजी उपनगराध्यक्ष राजेश राऊत म्हणाले की, मी बॉडी बिल्डींग असोसिएशनच्या माध्यमातून अनेक स्पर्धा घेवून जालना शहरात बॉडी बिल्डींग या खेळास चांगल्यारित्याने तरुणांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला. अश्विन भास्करराव अंबेकर यांनी अशा खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम घेतला हे निश्चित कौतुकास्पद आहे. अशा प्रकारच्या चळवळी शहरात सुरु राहणे गरजेचे आहे. जे तरुण व्यायाम करतात आरोग्याकडे लक्ष देतात ते सदा निरोगी राहून वाईट सांगती व सवयीपासून दुर राहत असल्याचे राजेश राऊत म्हणाले. भविष्यातही अश्विन अंबेकर यांनी अशा प्रकारचे उपक्रम राबवून तरुणांना व विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करावे. जेणे करुन जालना शहरात क्रिडा चळवळ अत्यंत चांगल्या पध्दतीने वाढण्यास मदत होईल, असे राऊत म्हणाले. यावेळी महेश तलरेजा, प्रा. राजकुमार बुलबुले यांनीही समोयोचित मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना कार्यक्रमाचे आयोजक अश्विन भास्करराव अंबेकर यांनी म्हटले की, मानवी जीवनात ज्ञान, आरोग्य, अर्थ या तिनही शक्तींना खुप महत्व आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाNया गुणवंतांचा गौरव मित्र मंडळाच्या वतीने आयोजन केले. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाNया मान्यवरांचा आदर्श समाजासमोर ठेवून इतरांनीही त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी हा असल्याचे अश्विन अंबेकर म्हणाले. कार्यक्रमासाठी आवर्जुन सर्व सत्कारमुर्ती व विद्यार्थी यांनी उपस्थित राहील्या बद्दल आभार व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या. वेळी माजी शहरप्रमुख बाला परदेशी, युवासेनेचे शहरप्रमुख दुर्गेश ठोठीवाले, किशोर नरवडे, राजु माधोवाले, मिलिंद काळे, सदाशिव वाघमारे, जय शेंदरकर,संदीप मगर, विष्णु शिनगारे, किशोर शिंदे, गोपाळ चौधरी च्यासह मोठ्या संख्येने मित्रमंडळातील पदाधिकाNयांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मयुर मेघावाले, रोहित भुरेवाल, आकाश जपुत, आदित्य जागडे, शेषपाल राजपुत,हर्षद खाकीवाले, कुणाल देशमुख,सौरभ से,गणेश सराटे,मनोज धानोरे, दिपक बारवकर,सिध्देश्वर सुपारकर,बळीराम नप, पार्थ ढाकणे, कुणाल खाकीवाले, कृष्णा भगत, गणेश डोके,ओमकार कावळे,लक्ष्मण घनवट यांनी प्रयत्न केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *