ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आरोग्य विषयक कायद्यांची जनजागृती व्हावी : न्या. सुवर्णा केवले रोटरी मिड टाउन तर्फे जिल्हा न्यायालयात स्थूलता तपासणी शिबिर

October 30, 202114:19 PM 53 0 0

जालना ( प्रतिनिधी) : प्रत्येक नागरिकांस सदृढ आरोग्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध होणे हा घटनात्मक अधिकार असून तसे कायदे सुध्दा आहेत. स्वयंसेवी संस्थांनी विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघाच्या मदतीने आरोग्यविषयक कायद्यांची जनजागृती करावी .अशी अपेक्षा प्रधान जिल्हा व सञ न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी आज येथे बोलतांना केली. “आझादी का अमृत महोत्सव ” अंतर्गत रोटरी क्लब ऑफ जालना मिड टाउन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जालना क्रिटिकल हॉस्पिटल च्या सहकार्याने शुक्रवारी ( ता. 29) जिल्हा न्यायालय परिसरात स्थूलता तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी न्या. सुवर्णा केवले बोलत होत्या .अध्यक्षस्थानी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. संजय देशपांडे हे होते. रोटरीच्या उपप्रांतपाल रो. डॉ.सुमित्रा गादिया, मिड टाउन चे अध्यक्ष रो. ॲड. महेश धन्नावत, सचिव रो.प्रशांत बागडी, वकील संघाच्या सचिव ॲड. शारजा शेख, उपाध्यक्ष ॲड. राजेंद्र राऊत, सहसचिव ॲड. जगदीश मदन, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. बी. पारवेकर ,डॉ. योगेश भडक, नितीन माळी,रोटरी रेनबो च्या अध्यक्षा रो. स्मिता चेचाणी, ॲड. अश्‍विनी धन्नावत, ॲड. शुभम भारूका यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

 

न्या. सुवर्णा केवले यांनी विधीज्ञ, न्यायालयीन कर्मचारी यांच्या साठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केल्या बद्दल समाधान व्यक्त करत रोटरी मिडटाउन ने अखिल भारतीय जनजागृती अभियाना अंतर्गत कायदे विषयक शिबीरे सुध्दा घ्यावी. असे न्या. केवले यांनी नमूद केले.
जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. संजय देशपांडे म्हणाले, वृक्षारोपणा नंतर न्यायालय परिसरात रोटरी मिडटाउन ने घेतलेल्या शिबीरामुळे वकील आणि कर्मचारी यांना आरोग्याची स्थिती समजून घ्यावयाची दक्षता कळेल. असे सांगितले.
प्रास्ताविकात रोटरी मिडटाउन चे अध्यक्ष रो. ॲड. महेश धन्नावत यांनी विविध क्षेत्रातील सेवा देणाऱ्या व्यक्तींचे आरोग्य सदृढ रहावे हा दृष्टीकोन समोर ठेवून रोटरी मिडटाउन ने पोलीस प्रशिक्षणार्थीं यांच्या नंतर जिल्हा न्यायालयात तपासणी शिबीर आयोजित केले असून आगामी काळात अन्यञ ही शिबीरे घेतली जातील. अशी भूमिका ॲड. महेश धन्नावत यांनी स्पष्ट केली. सुञसंचालन ॲड.शुभम भारूका यांनी केले तर रो प्रशांत बागडी यांनी आभार मानले. यावेळी ॲड.सुरेश कुलकर्णी, ॲड.सय्यद तारेख, ॲड.हरी काकडे ,ॲड.योगेश खरात, ॲड. संदेश तुपे , ॲड. अरविंद मुरमे यांच्या सह विधीज्ञ, न्यायालयीन आणि विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी उपस्थित होते. पावणे दोनशे जणांनी शिबीराचा लाभ घेतला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *