ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आरोग्य – मित्र महाराष्ट्रच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी मनोज पाटणी,जालना जिल्हाध्यक्षपदी दिपक शेळके तर परभणी जिल्हाध्यक्षपदी मोहन धारासूरकर यांची निवड

June 12, 202112:26 PM 18 0 0

औरंगाबाद : गोरगरीब व गरजू रूग्णांसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या आरोग्य- मित्र महाराष्ट्रच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी मनोज पाटणी,जालना जिल्हाध्यक्षपदी दिपक शेळके तर परभणी जिल्हाध्यक्षपदी मोहन धारासूरकर यांची निवड करण्यात आली.मराठवाडयातील विभागीय पदाधिकाऱ्यांची आज शुक्रवारी औरंगाबादेत प्रदेशाध्यक्ष चंदुलाल बियाणी,प्रदेशकार्याध्यक्ष डॉ.प्रभू गोरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत सर्वाच्या सहमतीने तिनही जिल्हय़ातील पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. आरोग्य – मित्र,महाराष्ट्रच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष चंदुलाल बियाणी राज्यभर पदाधिकाऱ्यांचे जाळे भक्कम करत आहेत. हे सर्व पदाधिकारी गरजू रुग्णांसाठी वैयक्तिक, सामाजिक व शासकीय स्तरांवरील मदत मिळवून देत आहेत. सध्या आरोग्य-मित्र ,महाराष्ट्रने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे आरोग्य कार्ड मोफत काढून देण्याची व्यापक मोहीम हाती घेतली आहे.तसेच ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.

https://indianfast.com/

https://indianfast.com/

‘रूग्ण सेवा हिच ईश्वर सेवा ‘ या ब्रीदवाक्याला साजेसे कार्य करा-चंदुलाल बियाणी आपल्या देशाला समाजसेवेची गौरवशाली परंपरा आहे.त्यामुळेच जगात आपली वेगळी ओळख निर्माण झाली आहे.सध्या कोरोना महामारीमूळे आरोग्य सेवेत कार्य करण्यास चांगल्या संधी आहेत.देश,समाजाला आता आरोग्य सेवेत कार्य करणाऱ्या चांगल्या माणसांची नितांत गरज आहे. ही उणीव आरोग्य- मित्र, महाराष्ट्रचे पदाधिकारी नक्कीच भरून काढतील व रूग्ण सेवा हिच ईश्वर सेवा , या आपल्या ब्रीदवाक्याला साजेसे कार्य करतील, असा विश्वास,चंदुलाल बियाणी यांनी यावेळी व्यक्त केला.ते पुढे म्हणाले की, कोरोनामूळे समाजात अनेक गैरसमज आहेत. शासकीय मदतीबाबत लोकांमध्ये प्रचंड संभ्रम,गैरसमज निर्माण झालेले आहेत. खाजगी रुग्णालयात मनमानी सुरू आहे.औषधांवर कुणाचेही नियंत्रण राहिले नाही, अशा एक ना अनेक समस्या सोडविण्यासाठी आरोग्य -मित्र महाराष्ट्रचे पदाधिकारी तन, मन आणि धन लावून कार्य करत आहेत, अशा सेवाभावी परिवारात मनोज पाटणी,दिपक शेळके,मोहन धारासूरकर यांच्यासारख्या अभ्यासू, झोकून देऊन काम करणाऱ्या व जबरदस्त संघटन कौशल्य असलेल्या व्यक्तिमत्त्वांमूळे आरोग्य- मित्र महाराष्ट्रच्या समाजउपयोगी कार्यात नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास चंदुलाल बियाणी यांनी शेवटी व्यक्त केला. या बैठकीला विलास शिंगी,मुकेश मुंदडा,राधेश्याम झंवर,सचिन शेरे,हेमंत जकाते, अशोक भुतडा आदिंची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *