ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सर्व सामन्याच्या हक्कावर गदा आणणारा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लावला जावई शोध – संजोग हिवाळे

July 19, 202112:38 PM 76 0 0

आरोग्य मंत्रालय सांभाळणारे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे हे सर्व सामान्य लोकांच्या मतांवर निवडून आल्याचे विसरलेले दिसतात. त्यांना धनदांडग्या भांडवलदार डाॅक्टरांचा भारी पुळका आलाय महात्मा फुले जनारोग्य योजनेतून सामान्य माणसाचे शोषण होत आहे हे वास्तव लक्षात घेऊन टोपे बोलत नाहीत तर जालन्यात दाखल करण्यात आलेले तीन गुन्हे पोलिसांकडून चूकीचे दाखल करण्यात आल्याचा जावईशोध आरोग्य मंत्र्यांनी लावलाय. एकप्रकारे टोपे यांना पोलिसांवर हा थेट राजकीय दबाव निर्माण केला आहे.असा आरोप जिल्हाध्यक्ष संजोग हिवाळे आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे.


ज्या थर्ड पार्टी इन्स्पेक्शन ची टोपे माहीती देत आहेत ते कोण ? कुठे ? आहेत हे त्यांनी पध्दतशिरपणे लपवले आहे.
मुळातच महात्मा फुले जनारोग्य योजनेचे काम एक भयंकर गुढ आहे डाॅक्टर काहीच समजू देत नाहीत पेशंट हातघाईवर आलेला असतो मग डाॅक्टर करतील ती पूर्व दिशा असते जालन्यात अशा पंच्याहत्तर तक्रारी धूळखात आहेत यातील तीन तक्रारदार खूप मागे लागले फॉलोअप घेत उघड पुरावे सादर करून जिल्हाधिकारी,जिल्हा शल्यचित्किसक यांच्यासह अनेक वरिष्ठ कार्यालयात चपला झिझवल्यावर पुराव्यासह गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असे आम आदमी पक्षाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.
टोपे यांनी महात्मा फुले जनारोग्य योजनेतून “थर्डपार्टी” इन्स्पेक्शन कोण करतील याचे त्या योजनेतून लुबाडणूक करणाऱ्या प्रत्येक हाॅस्पीटल मध्ये मोठे फलक लावावेत माहीती लपवण्यात येऊ देऊ नये सगळ्या थर्डपार्टी समोर जाण्यास लोक तयार आहेत पण टोपे यांनी सामान्य माणसापर्यंत जाण्याची गरज निर्माण झालीय धनदांडग्या आणि लुटारू डाॅक्टरांना जाब विचारण्याची गरज आहे.असे आम आदमी पार्टीचे जिल्हा समन्वयक संजोग हिवाळे यांनी म्हटले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *