”चांगली नाती झाडासारखी असतात सुरवातीला त्यांची काळजी घ्यावी लागते
पण एकदा ती बहरली की आयुष्यभर कोणतीही परिस्थितीत सावली देतात”
असे एक नात म्हणजे मैत्रीच . ‘नात हे हृदयातून जुळते काळाने दुरावते किंवा अधिक घट्टसुद्धा होते .पण त्या नात्याच्या आठवणी मात्र हृदयाच्या कोणत्यातरी कोपऱ्यात सहजपणे जपल्या जातात .
नाते हे जीवनातील फार महत्त्वाची भूमिका बजावतात .आपण सर्वच आयुष्यात नात्यांच्या संपर्कात जगतो .मानवी जीवन हे सदैव नात्यांच्या वर्दळीतच असत. आणि हो ,हेही तेवढंच खर आहे की हल्ली स्वत;ला सुरक्षित ठेवणे किंवा जपण अवघड आहे, तर नात्यांचा विचारच बाजूला असतो.नात्यांची अनेक रूपे असतात ,जसे काही बोलकी ,काही अबोलकी,काही परिचित,काही जवळची,काही औपचारिक.नाते हे जीवनाला खऱ्या अर्थाने जगायला शिकवतात. आणि त्याच नात्यांमध्ये विलक्षण व अजब,सोन्याहूनही पिवळ म्हणजे मैत्रीच नात.
मैत्री हे अस नात आहे की जे थेट हृदयापासून येत आणि श्वासांसोबत जगात असत.खरच न मित्रांनो ,मैत्री किती ग्रेट असते ना! मैत्री! व्वा किती आपलस वाटल बोलून. मित्र किंवा मैत्रिणी आपल्या आयुष्याच्या किती अविभाग्य घटक असतात ना आणि त्यात जर मित्र किंवा मैत्रीण जिवलग असेल तर जगण्याचा शिकवते.मैत्री सर्व नात्यांपेक्षा किती जवळची असते ना !
सर्व जग जेव्हा आपल्यापासून दूर होत तेव्हा मात्र मैत्रीचा घट्ट धरलेला हात कधीच आपल्याला दुरावा देत नाही. जेव्हा आपण खूप संतापात असतो आणि आपण म्हणतो,’कृपा करून मला एकट सोडा ‘. तेव्हा सर्व नात्यांच्या पैलू आपल्याला एकट सोडतात,पण आपला मित्र किंवा मैत्रीण तिथेच उभी असतात .आपल्या चेहऱ्यावरील भावनांच्या बदलाची वाट पाहत.
खरंच न दोस्तहो हीच असते न ती मैत्री.अगदी निक्खळ आणि खऱ्या अर्थाने सांगावयाचे झाल्यास जिवाभावाची. तेव्हा या नात्याला सोन्यासारखे जपायलाच हवे.
म्हणून मैत्री या नात्याविषयी म्हणावेसे वाटते कि,
”कुणीतरी असावं आपलंही संकटी धावून यायला ,
चुकीचे करतांना काही हात धरून थांबवायला….
कुणीतरी असावं आपलही योग्य मार्ग सुचवायला,
आयुष्यभर संगे राहायला आणि अखेरपर्यंत साथ द्यायला..ज्यातुन मनाला मिळणारा विसावा असतो..मैञीच जग नितळ असतं..
तिथे नसतो कुठला मतभेद अवहेलना..उपेक्षित अस काही…
म्हणुनच हा लेख माझ्या मैञीला समर्पित करते..
लेखन
तृप्ती अभिजीत बोनगिरवार
Leave a Reply