धरणी कुशीतीलं बिजाला रुजवणारा
कोवळ्या कोंबांना जगवणारा
आळवाच्या पानांवर मोती होऊन चमकणारा
संगतीचा परिणाम दर्शविणारा
ढगांच्या कुशीतून कोसळणारा
तरिही न रडणारा
जिथं जाईल तिथलाच होणारा
कर्म पुर्ती नंतर वाफ बनून
पुन्हा ढगांच्या कुशीत शिरणारा
धरणीपर्यंतचा प्रवास एकट्याने करणारा
सृष्टी चक्राचा घटक बनणारा मातीत मिसळला जरी
अस्तित्व टिकविणारा
सागरास धाव घेवून सागरच बनणारा
इवलेपनानं खचून न जाणारा अन्
मोठेपनानं गर्वानं न मातनारा
पाऊस इवला रिमझिमणारा रिमझिमणारा
सुलोचना बागल(वडूज-सातारा)
8888071822
Leave a Reply