ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जालना जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसगट मदत करा आ. कैलास गोरंट्याल यांची मंत्री अशोकराव चव्हाणांकडे मागणी

October 11, 202116:03 PM 4 0 0

जालना (प्रतिनिधी) ः मागील महिण्यात जिल्ह्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे तसेच शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसगट भरीव आर्थीक मदत करावी अशी मागणी आ. कैलास गोरंट्याल यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठनेते अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली आहे.


नांदेड येथून जालनामार्गे औरंगाबादकडे जात असतांना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण हे काहीवेळ अंबड चौफुली जवळील शासकीय विश्रामगृहात थांबल्यानंतर आ. गोरंट्याल यांनी त्यांची सदिच्छा भेट घेवून अतिवृष्टीमुळे जालना विधानसभा मतदार संघासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबद्दल त्यांच्याशी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या नुकसानीशिवाय जालना शहर व जिल्ह्यात अनेक घरांची पडझड होवून गोरगरीबांचे संसार उपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे न करता शेतकऱ्यांसह ज्या गोरगरीब कुटूंबीयांचे नुकसान झाले आहे अशा सर्वांना राज्यशासनामार्फत तातडीने भरीव आर्थीक मदत देण्यात यावी अशी आग्रही मागणी आ. कैलास गोरंट्याल यांनी अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली आहे.
याबाबत सकारात्मक विचार करून राज्यशासनातर्फे आर्थीक मदत मिळून देण्यासाठी शासन स्तरावर निश्‍चितपणे प्रयत्न करण्यात येईल अशी ग्वाही मंत्री अशोकराव चव्हाण यांनी आ. गोरंट्याल यांना दिली. यावेळी शहराध्यक्ष शेख महेमूद, जिल्हा उपाध्यक्ष राम सावंत, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, नगरसेवक विष्णू वाघमारे, जीवन सले, गणेश चौधरी, दत्ता घुले, विशाल धानुरे, अरुण घडलिंग आदींची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *