ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मॅन्युअल सकॅव्हेंजर ऍक्ट नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पीडित कुटुंबाना प्रत्येकी 10 लाख रुपये मदत करा – संजोग हिवाळे

May 7, 202115:54 PM 50 0 0

जालना (प्रतिनिधी)- : आम आदमी पक्षाच्या वतीने जालना जिल्हा अध्यक्ष संजोग हिवाळे यांच्या नेतृत्वात प्रवीण दासूद, सुभाष बोर्डे, कृष्णा यादव व इतर कार्यकत्यांसह. दिनांक ०६ मे २०२१ रोजी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक, याना लेखी निवेदन देऊन मागणी केली. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, दिनांक ३० एप्रिल २०२१ शुक्रवार रोजी दुपारी तिन नंतर सेफ्टी टॅंक स्वच्छ करण्यास मुळे यांनी सांगलीतले व त्या नंतर लुकस गायकवाड़ (आनंद नगर) प्रकाश घोडके (रमाबाई नगर) आणी बाबा सुल्तान बेग (रेल्वे स्टेशन) हे तिन्ही ही कामगार सेफ्टी टगा मध्ये उतरल्यानंतर काही वेळातच आरडा-ओरड सुरु झाली.अन् मोठा गोंधळ झाल्यानंतर अन्य सफाई कामगार घटना स्थळ वरुन फरार झाले. गोधंळ चा आवाज ऐकुन परीसरातील रहीवाशानी घटनास्थळ वर धाव घेतली मात्र तोपर्यंत खुप उशीर झाला.अन् क्रमा क्रमाने एका पाठोपाठ एका सफाई कामगार अत्याधुनिक यांत्रिक संसाधने अभावी मुत्यु मुखी पडले.


या गंभीर प्रकरणानंतर मैन्युअल स्कव्हेंजर कायद्याची अंमलबजावणी तही किती हलगर्जीपणा केला जातो.हे यावेळी दिसुन आले. संबंधित कायद्यानुसार कोणतेही व्यक्ति स्थानिक संस्था, कोणतेही प्रतीनिधी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रित्या कोणत्याही व्यक्तीला गटार किंवा सेफ्टी टग अथवा धोकादायक साफसफाई साठी कामावर ठेवू शकत नाही.किंवा अश्या कामात फुस लावणे, जबरदस्ती करणे, अश्या कामात कोणत्याही व्यक्ती कडुन काम करून घेता येणार नाही.या कायद्यात प्राथमिक स्वरुपात केल्यास दोन वर्षापर्यत तुंरुगवासाची शिक्षा किंवा दोनों लाख रूपये रूपये अथवा दोन्ही ही शासन होऊ शकतो. या सारखा कठोर कायदा असुनही समाज मनावर प्रभाव करु शकला नाही.
उच्च न्यायालय, राज्यशासन, मानव अधीकार आयोग अश्या विषयाने चिंतित असुनही या घटनेला काही दिवस उलटले असताना च मुंबई ची पुनरावृत्ति पुन्हा एकदा मराठवाड़ा तील जालना शहरातील सेप्टिक टाकीत तीन सफाई कामगार च्या मुत्युची घटना ही निश्चितच माणुसकीला काळीमा फासणारी आहे.
“मैन्युअल स्कव्हेजंर अक्ट” २०१३ आजपर्यंत आठ ते नऊ वर्षाचा कालावधी झाला आहे.तरीही राज्य अन् देशभरात गटारात आती सेप्टिक टग मध्ये गुदमरून स्वच्छता कामगाराचे मुत्यु अजुनही थांबले नाहीत. यावर चिकित्सक अन् प्रबोधन करणे ही काळजी गरज आहे.


ज्यादा राज्यात-देशात एससी.एसटी.जमातीच्या प्रर्वगातील सदस्यांना अपमानित, जबरदस्ती ने फुस लाऊन अश्या हेतूने अथवा हेतु नसताना ही झालेल्या अपमान साठी किंवा धमकीकरीता अत्याचार प्रतीबंधक कायदा अंतर्गत पाच वर्षापर्यत सश्रत कारावासाची तरतुद असताना ही मात्र स्थानीक लोकप्रतिनिधी अथवा स्थानीक संस्थेच्या अक्षम्य दुर्लक्षित कृती मुळे हाताने साफ सफाई करणार्या सफाई कामगाराच्या होणार या व्यवस्थात्मक प्रत्यक्षरित्या खुनाना अप्रत्यक्षरित्या आकस्मिक मृत्यु म्हणत बाजुला सारले जाते. हे स्वातंत्र्य लोकशाही ची अवहेलना अथवा विडंबना च म्हणावे लागेल.!
“स्वच्छ शहर- सुंदर शहर” म्हणुन आपल्या शहराची वर्णी लागावी म्हणून शहरात पाठोपाठ शहरा चा घोळका जमा होताोय,मात्र अत्याधुनिक यांत्रिक औजारै, संसाधने अभावी सफाई कर्मचारिना हाताने सफाई (मैला) साफ करण्यासाठी भाग पाडले जाते.त्यांच्या कुटुबं अन् पुनर्वसन कडे दुर्लक्ष करणे म्हणजे “स्वच्छ भारत सुंदर भारत” प्रक्रीयेला खिळ लागण्याचा प्रकार होय!
आपण याबाबत गांभीर्यपूर्वक लक्ष घालून घर मालक मुळे व स्वछता निरीक्षक तसेच त्यावर नियंत्रण असणारे नगर परिषद मुख्यधिकारी जालना यांचावर मॅन्युअल सकॅव्हेंजर ऍक्ट नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून योग्य ती कार्यवाही करावी, पीडित कुटुंबाना प्रत्येकी 10 लाख रुपये मदत देण्यात यावी अशी मागणी लेखी निवेदन देऊन मागणी करण्यात आली .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *