ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

भंडारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था व भंडारी वाघीण ‌स्त्री शक्ती समिती मार्फत पूरग्रस्त, दरडग्रस्तांना मदतीचा हात

August 19, 202116:10 PM 11 0 0

मुरूड जंजिरा ( ‌सौ. नैनिता कर्णिक) महाड‌, रत्नागिरी,खेड चिपळूण येथे पूरग्रस्त , दरडग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी ‌स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून भंडारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था व भंडारी वाघीण ‌स्त्री शक्ती समिती महाराष्ट्र राज्य यांनी पूरग्रस्त, दरडग्रस्त भागात जाऊन एक हात ‌मदतीचा ह्या संकल्पनेतून तेथील स्थानिक लोकांशी चौकशी करून मदतीचा हात पुढे केला, या वेळी मदतीचा हात म्हणून प्रत्येक घरटी जीवनावश्यक वस्तू सह अंगदुखी, अशक्तपणा, रक्तवाढ, प्रोटीन, कॅल्शिअम कॅप्सुल इत्यादींचे वाटप करण्यात आले.


यावेळी चिपळूण मधील श्री समर्थ ‌भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेला भेट देऊन जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. यावेळी भंडारी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दर्शन प्रकाश पारकर , उपाध्यक्ष अश्विन पाटील,कार्यकरणी सदस्य सचिन कदम, विलास आंब्रे, रोहा तालुका प्रमुख दीप वायडेकर यांच्या उपस्थितीत पूरग्रस्त ,दरडग्रस्त नागरिकांना मदत केली गेली…

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *