कराड-पाटण प्रतिनिधी (सुप्रिया कांबळे) : माता फाउंडेशन मार्फत पूरग्रस्तांना मदत तळमावले, ता. महाराष्ट्र राज्य धरणीमाता फाउंडेशन मार्फत पाटण तालुक्यातील पूरग्रस्त भागात मदत करण्यात आली. तालुक्यातील आंबेगाव, हुंबरळी, मिरगाव या गावात दरडी कोसळल्यामुळे खूप मोठे नुकसान झाले यात दुर्दैवाने अनेक लोकांचा दरडी खाली सापडून मृत्यू झाला. अनेकांची घरे उद्धवस्थ होऊन कुटुंबे बेघर झाली. या लोकांच्या डोळ्यापुढे आपले संसार कसे उभे करायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला.
उघड्यावर पडलेल्या संसाराला हातभार लावण्यासाठी महराष्ट्रा राज्य धरणीमाता फाउंडेशन पुढे आली या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कुंभारगाव, तळमावले, ढेबेवाडीवाडी विभागासह मुंबई विभागातून लोकांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. याला लोकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
तालुक्यातील जितकरवाडी, भत्रेवाडी, धनावडेवाडी, शिंदेवाडी, तामीने, आंबेघर, हुंबरणी, नवाज, डिचोली, मानाईनगर, कामारगाव या पूरग्रस्त भागातील कुटुंबांना संसार उपयोगी साहित्य यामध्ये अंघोळीच्या बादल्या, मग, कचरपेटी, झाडू, ब्लॅंकेट, चादरी, चटई, अन्नधान्य किट, कपडे यासारखी मोठी मदत करण्यात आली. कोरोना आणि पुरामुळे अडचणीत सापडलेल्या कुटुंबाना मदत करून धरणीमाता फाऊंडेशन ने आपली सामाजिक बांधीलकी जपली.
मदत वाटप करताना सतीश वाघ, विक्रम नलवडे, अक्षय मोरे,योगेश वाघ, अजिंक्य माने हे उपस्थित होते.
दरड कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या कुटुंबांना आंबेघर मध्ये संसार उपयोगी साहित्याचे वाटप करताना धरणीमता फाउंडेशन चे पदाधिकारी
Leave a Reply