जालना ( प्रतिनिधी) : राज्यात कडक लॉक डाऊन सुरू झाले असून रस्त्यावरील असलेले गरजवंत आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील नातेवाईक यांच्या मदतीस सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले अर्जुनराव खोतकर प्रतिष्ठान धावून आले असून गुरुवारी ( ता. 22) प्रतिष्ठानच्यावतीने अन्नाची पाकिटे वाटप करण्यात आली.
या वेळी बोलतांना प्रतिष्ठान चे संस्थापक संकेत नवगिरे व गौरव नवगिरे यांनी सांगितले की,संकट आणि गरज पडेल तिथे जनतेच्या मदतीला धावून जाण्याची प्रेरणा शिवसेना नेते, माजी मंत्री तथा कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती अर्जुनराव खोतकर यांच्या व्यक्तिमत्त्वातून घेत त्यांच्याच नावाने सुरु असलेल्या प्रतिष्ठान मार्फत कोरोना संसर्गापासून बचावासाठी यापूर्वी जालना शहरात मास्क, सॅनिटाइजर चे वाटप करण्यात आले.
सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन मुळे जिल्हा स्ञी रूग्णालयात रूग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय टाळावी तसेच रस्यांवर बेसहारा असलेल्या नागरिकांचे ” उदर भरण व्हावे ” या साठी आम्ही अल्पसा प्रयत्न केला असून या पुढे ही यथाशक्ती गरजवंतांना मदत केली जाईल. असे संकेत नवगिरे यांनी स्पष्ट केले.
या वेळी गौरव नवगिरे, अक्षय लोखंडे, आकाश मांटे,सुधीर पवार, बालाजी हंडे, राजेश जुंबड ,दिनेश गायकवाड ,कुलदीप डोळझाके, शुभम शिंदे, योगेश डोंगरे ,प्रतिक वाघमारे ,अरविंद गवळी यांच्यासह स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला
Leave a Reply