ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सिताई फौंडेशनचा मदतीचा हात

August 24, 202118:19 PM 50 0 0

सुप्रिया कांबळे(कराड-पाटण)प्रतिनिधी तळमावले, ता. : येथील विभागात अतिवृष्टी मुळे खूप नुकसान झाल्यामुळे रूवले व उधवणे गावामधे घरातील सर्व वस्तू भिजल्यामुळे लोकांचे खूप हाल झाले त्यामूळे माजी सरपंच विजय साळुंखे रामचंद साळुंखे व रुवले गावचे विद्यमान सरपंच यांचे मागणीनुसार जीवनाश्यक वस्तू व साड्या चे वाटप करण्यात आले या सर्व साड्या सीताई महिला उद्योग,सिताई महिला बचत गट तळंमावले व कुठरे तांबवे येथील गटातील सदस्य यानी जमा करुन दिले याशिवाय सखी कलेक्शन तळमावले

धुमाळवाडी येथील गटातील सदस्य यांचे सहकार्य लाभले.योगेश्वर टोनपे तहसीलदार सो व मीना साळुंखे गटविकास अधिकारी यांचे आवाहना नुसार आम्ही पाहिले जितकर वाडी व आज उधवणे रू व ले येथे गरजूंना एक मदती चा हात या भावनेतून मदत करण्यात आली याशिवाय यापुढे पण असेच मदत कार्य चालू राहिल असे मत सिताई फाऊंडेशन व उद्योग समूहाच्या अध्यक्ष कविता कचरे यानी व्यकत केले सोबत सिताई फाऊंडेशन च्या सदस्या तेजस्विनी करपे व संभाजी जाधव शुभम माने किरण होव्हाळ आदी उपस्थित होते

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *