जालना ( प्रतिनिधी) : समाजात प्रत्येक ठिकाणी गरजवंत आहेत. त्यांचा शोध घेऊन गरजेनुसार मदत करणे हीच खरी मानवसेवा असल्याचे प्रतिपादन जालना जिल्हा अग्रवाल महिला संमेलनाच्या जिल्हाध्यक्षा सौ. स्मिता अरुण मित्तल यांनी आज येथे बोलताना केले.
अग्र नारी महिला प्रांतीय असोसिएशन संचलित महाराष्ट्र राज्य अग्रवाल महिला संमेलनाच्या जालना जिल्हा शाखेतर्फे सोमवारी ( ता. १९) देवमुर्ती ता. जालना येथील बगडिया फार्म हाऊस परिसरात गरजवंत महिलांना साड्या तसेच पावसा पासून संरक्षणासाठी छत्र्यांचे वितरण करण्यात आले. या वेळी सौ. स्मिता मित्तल बोलत होत्या. जिल्हा सचिव डॉ. अनिता तवरावाला,निता बगडिया, अग्रवाल महिला मंडळाच्या अध्यक्षा शोभा देवीदान, छाया अग्रवाल , अनिता अग्रवाल , सरला बंसल, सोनल मित्तल, नीता अग्रवाल,संतोष भारूका यांची उपस्थिती होती.
डॉ.अनिता तवरावाला यांनी शहरी भागा सोबतच ग्रामीण भागातील गरजूंना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावे या हेतूने अग्रवाल महिला संमेलन तर्फे अल्पशी मदत देण्याचा प्रयत्न केला असल्याचे नमूद केले.
सोनल मित्तल यांनी सूत्रसंचालन केले तर नीता बगडिया यांनी आभार मानले .यावेळी अग्रवाल महिला संमेलनाच्या पदाधिकारी,तीस सदस्या आणि पंचक्रोशीतील गरजवंत महिलांची उपस्थिती होती.
Leave a Reply