ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जे एन पी टी बंदरात 125 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

October 9, 202113:54 PM 34 0 0

उरण (संगिता पवार) उरण तालुक्यात अनेकदा अमली पदार्थ पकडण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरु झाला आहे. कारण पुन्हा एकदा जे एन पी टी बंदरामध्ये अमली पदार्थ पकडण्यात आले आहे.उरणमधील जेएनपीटी बंदर परिसरातील एका यार्डमध्ये 25 किलो हेरॉईन सापडले आहे.यामुळे उरण मध्ये एकच खळबळ माजली आहे.डीआरआयच्या पथकाने छापा मारला असता, बंदरातील एका कंटेनरमधून हे ड्रग्स जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे १२५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात आतापर्यंत एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.


डीआरआयच्या मुंबई युनिटने बंदरावर छापा टाकल्यानंतर नवी मुंबईतील ६२ वर्षीय व्यापारी जयेश सांघवीला अटक केली आहे. सांघवीवर इराणमधून शेंगदाणा तेलाच्या एका खेपेमध्ये हेरॉईन लपवून मुंबईत आणल्याचा आरोप आहे. डीआरआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती की, मुंबईच्या न्हावा शेवा बंदर परिसरात मोठ्या प्रमाणात ड्रग्स आणला जात आहे. या माहितीच्या आधारे आम्ही छापा मारला आणि ही कारवाई केली असल्याचे सांगितले.125 कोटी रुपयाचे हेरॉईन सापडल्याने आता पुन्हा एकदा अमली पदार्थाची तस्करी जे एन पी टी बंदरात मोठ्या प्रमाणात होत असल्याचे सिद्ध झाले आहे. आता डी आर आय च्या अधिकाऱ्यांना जास्त सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
सविस्तर माहिती अशी की वैभव एंटरप्रायजेसचे संदीप ठक्कर यांनी कंटेनर आयात केले होते . डीआरआय टीमने त्याची चौकशी केली. चौकशी केली असता ठक्करने डीआरआयला सांगितले की, संघवीने त्याला त्याच्या फर्मच्या आयईसीमध्ये इराणमधून वस्तू आयात करण्यासाठी 10,000 रुपये प्रति माल पाठवण्याची ऑफर दिली होती. तो 15 वर्षांपासून संघवीसोबत व्यवसाय करत होता, त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून हा माल आणण्याची परवानगी दिली. ठक्करलाही यात ड्रग्स आणत असल्याची माहिती नव्हती.डीआरआयने सांघवीला अटक केली आणि त्याच्याविरुद्ध नारकोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सब्स्टन्स ऍक्ट (NDPS) अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्याला गुरुवारी महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 11 ऑक्टोबरपर्यंत डीआरआय कोठडी सुनावली आहे. सांघवीच्या अटकेनंतर, आता डीआरआय टीम जेएनपीटी बंदरावर उपस्थित असलेल्या इतर काही कंटेनरचा शोध घेत आहेत.या सर्व घटनेमुळे उरण मध्ये एकच खळबळ माजली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *