ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

हिंदी दील की धडकन तो मातृभाषा दील की आवाज

September 13, 202113:33 PM 50 0 0

हिंदी भाषा ही देशाचा आधारस्तंभ आहे त्यामुळे सर्वच प्रकारच्या शिक्षणामध्ये हिंदीला सक्तीची केलीच पाहिजे. देशात आनंदाची गोष्ट आहे की २०१४ पासुन हिंदी भाषेचा प्रसार भारतातच नाही तर संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात होत आहे.युनो सारख्या मोठ्या मंचावर दीवंगत नेता अटल बिहारी वाजपेयी,सुष्मा स्वराज यांनी हिंदी भाषेत आपले विचार मांडुन देशाचा “गौरव उंचावला” आणि मोदी पंतप्रधान झाले तेव्हा पासुन संपूर्ण जगात हिंदी भाषेचा प्रसार होत आहे हि भारताच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची आणि कौतुकास्पद बाब आहे याचं मी खुप खुप स्वागत करतो.भारताची “राष्ट्र भाषा हींदी”आहे.तीला कुठेही तडा जाणार नाही याची जबाबदारी संपुर्ण भारत वासीयांची आहे.देशातील कोणताही व्यक्ती असो त्याला “हिंदी भाषेचे”ज्ञान असायलाच पाहिजे.कारण हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून ओळखल्या जाते.”हिंदी भाषा व प्रादेशिक भाषा”या प्रत्येकाला येणे व समजने अती आवश्यक आहे.परंतु आताही भारतातील काही दीग्गज नेतागन, वॉलीउड अभिनेता, सेलिब्रिटी विदेशी दौऱ्यावर जातात तेव्हा “इंग्रजी”ला खुपच महत्त्व देताना दिसतात हे बरोबर नाही.परंतु पर्यायी भाषा म्हणून “इंग्रजी”चा वापर व्हावयास पाहिजे.परंतु राष्ट्रीय भाषेला तेवढेच महत्व देणे गरजेचे आहे.भारतीय भाषा बऱ्याच आहेत त्या समृध्दीही आहेत पण दक्षिणेतील भाषा समजायला कठीण जातात.हिंदी भाषा मात्र सर्वांनाच लवकर समजते व अवगत होते.सर्वच धर्माच्या लोकांना हिंदी भाषेची जान आहे.फक्त दक्षिण भारतातील काही राजकीय पुढारी हिंदी भाषेची घृणा व विरोध करतांना दिसतात.ते विदेशी इंग्रजी भाषा बोलायला तयार आहेत परंतु हिंदी भाषा बोलायला तयार नाहीत,हे कीतपत योग्य समजावे?

भारतात अनेक धर्म, अनेक भाषा, अनेक पंथ, अनेक जाती आहेत.परंतु कोणीच आता पर्यंत हिंदीचा विरोध केलेला नाही.फक्त दक्षिणमध्येच हिंदीचा विरोध होतो. २०१४ मध्ये हिंदी भाषेच्या विरोधात करूनानिधिनी राग उगारला होता व फालतु कुरापती काढलेल्या होत्या.तामिळनाडुत करूणानिधी यांनी १९६५ मध्ये हिंदी भाषेचा कडाडून विरोध केला होता व त्यावेळेस राज्यात हिंदी विरूद्ध आंदोलन उभारण्यात करूनानिधींचा मोठा वाटा होता.या आंदोलनाला हिंसक वळणसुध्दा लागले होते.शेवटी तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी देशात “त्रिभाषा” सूत्र सुरूच राहील असे स्पष्ट केले होते व आंदोलन थांबले.हिंदी भाषेचा त्रास ज्यांना आहे त्यांनी आपल्या “प्रादेशिक”भाषेचा वापर अवश्य करावा.आपण सर्व “हिंदुस्थानात” रहातो मग सर्वांनाच हिंदी भाषा का येऊ नये?आपण संपूर्ण देशात “इंग्रजी”भाषा सक्तीची करू शकतो मग हिंदी भाषा का नाही? भाषा वाद पहाता २०१४ मध्ये केंद्रीय गृहमंत्र्यानी निर्णय घेतला की केंद्र सरकारमधील सर्व अधिकृत सोशल मीडिया अकाउंट्सवर प्रामुख्याने हिंदीतुन व्टिट करण्यात यावे आणि इंग्रजी ही “ऐच्छिक भाषा” असेल असे जाहीर केले होते.कारण सर्वांनाच हिंदी भाषा अवगत आहे.भारतात आता २८ राज्य व ८ केंद्र शासीत प्रदेश आहेत. त्यात जर एकट्या तामिळनाडू सारख्या राज्याचा हिंदी भाषेला आताही विरोध असेल तर ते योग्य नाही.आपली मूळातच इंग्रजी भाषा नाहीच मग इतका इंग्रजीचा उहा-पोह किंवा लाड कशाला?देशाची राष्ट्रभाषा “हिंदी”आहे मग सर्वच राज्यांत “हिंदी” हा विषय अनिवार्य का नाही?मी सरकारला आवर्जुन सांगेल की,आपली मातृभाषा (प्रादेशिक भाषा),आपली राष्ट्रभाषा व नंतर “इंग्रजी भाषा” सर्वच राज्यांत सक्तीची करावी.जो राजकीय नेता राष्ट्रभाषेचा विरोध करेल त्याला दंडीत केलेच पाहिजे.कारण राष्ट्रभाषेचा विरोध करने म्हनजे राष्ट्राचा अपमान करने होय असे मी समजतो.तामिळनाडुमधील अनेक लोक इतर राज्यात नौकरी करीत आहेत त्यांना हिंदीची जान आहे मग तामिळनाडूच्या नेत्यांना हिंदीचा विरोध का? संपूर्ण देशाने हिंदी भाषेची जोपासना करावी त्याच सोबत संपूर्ण राजकीय पक्षांनी हिंदी भाषेचा वापर सर्वात जास्त करावा.त्याचप्रमाणे पूर्ण सरकारी कामे प्रादेशिक भाषेत किंवा हिंदीतुनच व्हावयास पाहिजे.२०१४ मध्ये नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होताच करुनानिधी, जयललिता,वायको,उमर अब्दुल्ला यांनी हिंदी भाषेला विरोध केला होता.२०१४ मध्ये जम्मु काश्मिरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला म्हनाले होते की, भारतासारखा खंडप्राय देशात अनेक भाषा आणि बोली बोलल्या जातात या देशातील धार्मिक आणि भाषिक संस्कृती वेगवेगळ्या प्रकारची आहे अशा परीस्थितीत हिंदीचा अट्टाहास धरता येणार नाही असे त्यांनी त्यावेळेस म्हटले होते.परंतु राजनेत्यांनी हेही विसरु नये कि स्वतंत्र भारताची “राष्ट्रभाषा हिंदी”आहे. भारतात अधिकृत २२ भाषा असल्या तरी प्रत्येक ४० किलोमीटर अंतरावर आपण गेलो तर भाषा बदलत असते.याप्रमाणे भारतात ५०० हुन अधिक भाषा आहेत हा भारताचा इतिहास व गौरव असल्याचे मी समजतो.मग हिंदीला राष्ट्र भाषेचा दर्जा दीलेला आहे त्याचे काय?आपण स्वातंत्र्यात जगत आहोत व रहात आहोत.त्यामुळे इंग्रजीचा जास्त लाड करने योग्य नाही.आज आपण पहातो की उच्च शिक्षीत लहान मुलांना इंग्रजीतील आकडा वाचता येतो परंतु त्या आकड्याला मराठीत काय म्हणतात हा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थितीत राहातो.त्यामुळे मातृभाषेला व राष्ट्रीय भाषेला समान महत्व दिले पाहिजे.आजही प्रत्येक देशाला आप-आपल्या राष्ट्रीय भाषेचा अभिमान आहे.त्यामुळे जगातील संपूर्ण बलाढ्य देश आपल्या राष्ट्रभाषेचा वापर करतात.परंतु भारतात आजही इंग्रजीला अधिक जवळ करून महत्व देतात हे योग्य नाही.जो कोणी राष्ट्र भाषेचा विरोध करेल त्यावर कडक कारवाई व्हायलाच पाहिजे.ही बाब सत्य आहे की,२०१४ पासुन म्हनजेच माननीय नरेंद्र मोदी प्रधानमंत्री बनले तेव्हापासून संपूर्ण भारत “हिंदी भाषामय”झालेला आहे यात तिळमात्र शंका नाही.२०१४ पासुन आजपर्यंत संपूर्ण जगभर हिंदीचा प्रसार होत आहे ही भारताकरीता स्वाभिमानाची बाब आहे.परंतु आताही भारतात काही हिंदी विरोधक आहेत त्यांना हिंदीचा पाठपढविने गरजेचे आहे.देशात असेही प्रधानमंत्री होवुन गेले की त्यांनी हिंदीचा मुळातच वापर केलेला नाही.मनुष्य प्राणी हा बुध्दीमान आहे.त्याला सर्वच गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक आहे.त्याच प्रमाणे जगात प्रत्येक देशाच्या वेगवेगळ्या भाषा आहेत.त्याही शिकाव्या आणि शिकल्या पाहिजेत यामुळे ज्ञानाचा भंडार वाढतो.परंतु मातृभाषा आणि राष्ट्रभाषेला विसरता कामा नये हे सर्वांनीच लक्षात ठेवले पाहिजे.माझ्या माहीतीनुसार जगात इतक्या भाषा नसतील तीतक्या भाषा भारतात आहे त्या शिकाव्या परंतु “मातृभाषेचा व राष्ट्रभाषेचा” विसर पडुदेवु नका.जगात भारत असा देश आहे की या ठिकाणी देव-दानव,साधु-संत,महात्मे,त्यागी-योगी, थोरपुरुष,क्रांतीकारी, ऋषीमुनी इत्यादींच्या मंथनातून हा देश तयार झालेला आहे.ज्याप्रमाणे समुद्र मंथनातून अमृत निघाले होते.त्याचप्रमाणे राष्ट्रीय भाषेत व प्रादेशिक भाषेत तेवढाच गोडवा आहे.त्यामुळे जगातील प्रत्येक देशाच्या व्यक्तीला भारतीय संस्कृती भारावते आणि त्याचा आनंद सुध्दा घेतात.त्यामुळे आपल्या पुर्वजांनी “हिंदी भाषा” सरळ आणि सोपी बनवीली जेनेकरून ती सर्वांना समजायला हवी.हिंदी या शब्दात बरंच काही लपलेलं आहे हिंदी पासुन हिंदुस्थानात, हिंदवी स्वराज्य,जय हिंद, आझाद हिंद सेना अशा अनेक महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी शब्दांशी “हिंदी”शी नाते आहे.ते सर्वांनीच जपले पाहिजे.देश को हिंदी और मातृभाषा विरासत मे मिली है इसलीये “भारत महान”है.

लेखक रमेश कृष्णराव लांजेवार.

(माजि विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर)

मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.

 

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *