अत्यंत खडतर प्रवासातुन सुरुवात झालेल्या अष्टभुजा हिरकणीने काही दिवसातच लोकप्रियता मिळवीली आहे. अवघ्या महाराष्ट्रातुन या हिरकणी साप्ताहिक अंकाची मागणी होत आहे. महिलांना प्रधान्य देणारे आणि महिलांच्या कर्तुत्वाचे कौतुक करुन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे तसेच दिनदुबळ्या महिलांचा बुलंद आवाज म्हणून साप्ताहिक अष्टभुजा हिरकणीने ओळख निर्माण केली आहे.
जालना जिल्ह्यातुन सुरु झालेल्या या साप्ताहिकाने आता राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात पोहचण्याचा मान मिळविला आहे. महिला वर्गातुन होत असलेली मागणी आणि वाचकांनी दिलेल्या पसंतीमुळे हिरकणी साप्ताहिकाने डिजीटल भरारी घेतली आहे. साप्ताहिक अष्टभुजा हिरकणीचे डिजीटल पोर्टल तयार करण्यात आले असून वाचकांना तसेच महिला वर्गाला रोजच्या ताज्या अपडेट बातम्या आणि घडामोडी माहित झाल्या पाहीजे हाच अष्टभुजा हिरकणीचा प्रयत्न आहे. देशातल्या प्रत्येक महिलेला जागृत आणि सक्षम करण्यासाठी अष्टभुजा हिरकणीचा सदैव प्रयत्न राहणार आहे.
Leave a Reply